धड निजूसुद्धा
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- चला आता उठावेच.
- हो उशीर होईल नाहीतर...
- अरे पण थांब
- का ?
- ते.. कुत्रे निजले आहे...
- खरेच ! कशी त्याला गाढ झोप लागली आहे.
- अरे थांब, उठू नकोस, उगीच झोपमोड होईल त्याची.
- पण आपल्याला उशीर नाही का होणार ?
- होऊ दे रे ! काय इतके मोठे...
- अरे पण आपण उठलो नाही तर ते निजूनच राहील ! वा !
- इतके मोठ्याने बोलू नकोस. उठले दुसर्या काही कारणाने तर ठीकच झाले. नाही तर मग पाहता येईल थोड्या वेळाने. कसे मजेत निजले आहे नाही ?
- काय बोवा.
- असू दे रे !
- बरे झाले, ते पहा उठलेच. चला आता.
- च्च ! काय माशांचा ताप तरी. धड निजूसुद्धा...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP