प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- हे दोन वाजले ! पण अजून झोप नाही...
- थांब ! मांडीत, जांगाडांत चमक निघालीशी वाटते. पहा बरे ?
- अं ! काही नाही...
- गाथ बीठ नाही ना ?
- छे छे ! गाठ नाही न काही नाही ! उगीच...
- ही पहा !... आहे ! पुनः चमक निघाली ! हुश... आयोडीन कुठे टेबलावरच आहे ना ?
- हो तिथेच आहे. पण असा घाबरला आहेस का ? अगदी घामाघूम...
- काय असेल ते असो !... त्या विष्णूचे ऐकल्यापासून छातीत थोडेसे... धडधडायला लागले आहे !
- पण त्याने टोचून घेतले होते हे खरेच का ?
- आता काय सांगावे ! मी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले ते !
- बरे टोचून घेऊन... दिवस किती झाले होते ?
- चांगले वीस बावीस दिवस होऊन गेले होते.
- म्हणजे तू आणि त्याने एकाच दिवशी टोचून घेतले असे म्हणेनास !
- हो हो, असेच !
- आजारी केव्हा... तेरवा पडला नाही का तो ?
- तो तेरावा रात्री ! अन् आज सकाळी पार निकाल !... तो, त्याच्या शेजारचा तो एक विद्यार्थी...
- त्यानेही टोचून घेतले होते म्हणे !
- छेः मुळीच नाही. गप्प उठली होती ! मी त्याचा नक्की तलास काढला ना ! माझ्याने थोडेच...
- टोचून न घेता मेला म्हणायचा ! मग काही... !
- त्याचे काही नाही रे ! पण त्या विष्णूचे मात्र...
- हो ! तो टोचून घेतलेल्यांपैकी मेला नाही का ?
- म्हणूनच तर... माझी येवढी... !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP