सबब
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- अरे, तीन वाजायला आले ! चला निघावेच आता.
- कुठे त्या आण्णाकडेच जायचे असेल ना ?
- हो, तिथे जाऊन आपले वाचीत बसू.
- वाचीत बसू ! मला ठाऊक नसेल तर ना ? चहा ढोसायला
जायचे आहे, ते नाही सांगायचे !
- मग काय नको जाऊ म्हणतोस ?..... पण त्यात एवढे
बिघडले काय ?
- पुन: तेच ! शरम नाही वाटत ! उगीच आपले लोकांच्या
येथे जाऊन फुकटचा चहा ढोसायचा म्हणजे काय !
अगदीच संकोच नसावा.
- बरे आजचाच दिवस अं ! पुन: नाही कधी.
- पण आज तरी कशाला ? नको जाऊस. फिर माघारी !
पहा !
- असे रे काय ?
- काय, असे काय ! पन्नास वेळा सांगितले की तू फार
लाहड्यासारखे करतोस म्हणून ! पण तू काही ऐकत
नाहीस ! जा !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP