मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
आपली किंमत

आपली किंमत

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- चला आता, घरी चला. पुष्कळ झाले ह्य: ह्य: करणे !
ह्याची थट्टा कर, त्याची थट्टा कर.....
- खरेच बोवा नको हे आयुष्य ! किती वाटेल तितके जपा,
पण भानच रहात नाही. वास्तविक काय आपली योग्यता ?
- आपली योग्यता ? हं: आपली किंमत पंधरा नाहीतर वीस
रुपडे !
- पण डोक्यातले विचार आणि बोलण्याचे ऐट पाहिली तर
एखाद्या मोठ्या - जसा काही लेकाचा जर्मनीचा कायसर !
- बोल, लागेल तितके बोल.
- पण मी उगीच बोलत नाही.
- नाही माझी चूक आहेच ना ! डोके आणि जगातली किंमत
यांची जर बरोबर सांगड घातली तर कशाला असा
रडत बसलो असतो ?..... हुश्श ! छातीवर धोंडा
ठेवल्यासारखे झाले आहे अगदी !
- काय पहा ! जगातले आपले हसणे आणि रडणे अवघ्या
पंधरा - वीस रुपयांवर अवलंबून ठेवले आहेस, काय, म्हणावे
तरी काय तुला आता ?
- नुसते म्हणू नकोस ! चांगल्या लाथा - जोडे मार जोडे !
- जा ! ह्याच्यापुढे जा ! त्याच्यापुढे तोंड वेंगाड ! थू: थू: थू:
तुझ्यावर.....

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP