अमावस्या
नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.
- उद्याच जाऊ म्हणजे झाले.
- उद्या ?...
- का ? काही हरकत आहे ?
- नाही. तसे नाही, पण मला वाटते... उद्या नको. परवा गेलो तर नाही चालायचे ?
- हो चालेल तर काय झाले.
- कारण असे आहे - उद्याचा... दिवस चांगला नाही.
- चांगला नाही म्हणजे ?
- अरे उद्या आहे अमावस्या, तेव्हा आपले...
- हं !
- का, हसलाससा ?
- आता हसू नाही तर काय करू ? देवाच्या अस्तित्वाबद्दल अन् नास्तित्वाबद्दल, मारे लांबलचक गप्पा मारणारा तू !... आणि तुझा शुभाशुभावर विश्वास !
- विश्वास असा नाही... कचरतो एवढेच.
- हं हं !
- चालायचेच !... स्वभावतःच आपण भित्रे. आणि त्यातून दुर्दैवाने नडलेले तेव्हा... निव्वळ बुद्धी आणि विश्वास यांचा कितीसा टिकाव लागणार ?... आहे, धडपड आहे झाले !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP