अध्याय विषय ओव्या
१ मंगलाचरण-सर्व आश्रमांसी वंदन, आणि आमुचे कुलदेव मिळोन सुदुरुस्मरण, इतर ग्रंथ सुंदर असतां किमर्थ हा?
२ नगर-संस्थानी, आमुच्या जनांसी सदुरु नसे म्हणोनि राजा क्षोभला; तेव्हां भक्तांनी प्रार्थिला महाबळेश्वर
३ ईश्वर-पार्वती संवाद होऊनि, शंकर धांवला धरणी. येथें राम-कृष्ण आले कोठून? तरी हें वर्णन उत्कृष्ट, परि ग्रंथांपरी न होय, कां हे ऐसा संशय येत
प्रथम धर्मगुरु – श्रीपरिज्ञानाश्रम
४ महादेव, परिज्ञानाश्रम घेऊनि नांव, सदुरु आला; नगर संस्थानीं प्रयाण करी.
५ शृंगेरीं प्रयाण; देवीचे तेज घे आकर्षोन; शृंगेरीस्वामी तेज घे मागोन, आणि संमतिपत्र देती. स्वामींचे हृदय शांत, तरी आली कैसी खिन्नता तेय? काय अधर्म जाहला?
६ शंकराश्रमासी शिष्य करोनियां, स्वधर्म स्थापुनी उद्धरिलें जनांसी; बांधला मठ गोकर्णी.
७ निजभक्तांसी बोध करोन घेतली समाधि परिज्ञानाश्रमांनी.
गुरुभक्तांसी ठाब तो कैसा? मठ हा होय कैसें बंधन?
द्वितीय धर्मगुरु - श्रीशंकराश्रम
८ वंकीकोल-ग्रामीं जावोनि, दिधले दर्शन भक्तांलागोनि. विचारें कवणाचा शिरच्छेद करावा? पात्र कैसें व्हावें कृपेसी?
९ केला बोध जो आधीं होता निंदक बद्ध, दरिद्रिया केला श्रीमंत.
१० स्वामी जाती आनंदें समाधि-शेजीं चित्रापूर ग्रामांत. भटकळ ग्रामी दुर्लक्ष होतां खिन्न जाहले कां? भटकळ-जनांकारण इतुका क्षोभ कासया?
११ समाधिवरती मृत्तिकालिंग स्थापिती; तें भंग कराया अधिकारी प्रयत्न करिती; तें नाही विरघळलें; रक्त ओकूनियां ते मेले. आधींच शिष्यस्वीकार कां न केला? प्रेमा कैसा आणावा? न कळतांचि करुनी श्रवण, काय त्याचें प्रयोजन?
तृतीय धर्मगुरु – श्रीपरिज्ञानाश्रम
१२ परिज्ञानाश्रम तृतीय स्वामी झाले. सावकारकांतेसी वांचविलें.
१३ लक्ष्मणनामें अभक्तासी भेट होतां प्रेम उपजे मानसीं, शरण गेला गुरुचरणासी. देवासी होय कीं चिंता आमुच्या प्रपंचासाठीं? आणि सुखदुःख तत्त्वतः त्यासी बाधे कां? जरी ना गेला अनन्य शरण, कां न उद्धरावें त्यालागून? त्यागितां सारे विषय, देह अशक्त न होय?
१४ जनांसी करितां बोध उत्तम, करोनि शिष्यस्वीकार, निजधाम गांठिती. आमुचा प्रपंच सद्गुरुलागोन पुसावा कीं?
चतुर्थ धर्मगुरु - श्रीशंकराश्रम
१५ अनुष्ठानसमयीं शंकराश्रम दंडावरी ज्वर ठेविती. उत्तम बोध करिती. शिष्य-स्वीकार, ज्वर को न ठेवीत दंडावरीच सर्वदा?
१६ वड़े न भाजती विस्तव असोन, स्वामींस पेज न वाढिल्याकारण, केशवाश्रम-गुरुंचा अपराध कां न, त्यांच्याची आज्ञेवरूनी पेज नाहीं केली ती?
१७ पेज न वाढिल्याकारणें भक्तांनीं क्षमा मागितली; बोधुनी केलें समाधान स्वामींनी, सद्गुरूंसी द्यावें काय? हृदयीं मूर्ति कैसी येईल विषयचि गोड वाटती त्या?
१८ नरसोबावाढीच्या पुजाऱ्यासी स्वप्न झालें मी असें मल्लापुरासी; जातां तेथे तुज आणि तव पुत्रासी बरें होईल वदती, येथें रहस्य काय घ्यावें?
१९ मल्लापुर-समाधि उघढिती, बिल्वदळें ताजींच तेथे दिसती. पांडुरंगाश्रम कुमठ्यांत घंटा घेती स्वप्नापरी. सद्गुरुचि कां व्यापक? वाचितां पुस्तकें सर्वदी ज्ञान येईल, कासया सद्गुरु आम्हां?
पंचम धर्मगुरु – श्रीकेशवाश्रम
२० सात वरुषांचे एक बाळ वाचा नसतां करी तळमळ, त्यासी दिधली वाचा केशवाश्रमें. जरी सद्गुरुमहिमा आहे पूर्ण, तरी भक्तांवरी कासया येती संकटें?
२१ स्वप्नीं तेल चोळूनि, केला एक गरीच भक्त बरा, काय कसासी लाविला? शिष्य-स्वीकार
षष्ठ धर्मगुरु – श्रीवामनाश्रम
२२. कृष्णाश्रममूर्ति श्रेष्ठ ऐसें बालपणीं कथिलें भविष्य; वामनाश्रम स्वामींनी शिष्य-पाट दिधला. सद्गुरुमाय
कनवाळू दें कैसें? बालवयांतचि जनांचे रक्षण करावें, ऐसें त्यांसी कोठून उपजे ज्ञान इतुकें?
२३ वामनाश्रमगुरुनीं समाधि घेतली देवीस प्रार्थुनी, श्रीस्वामी आनंदाधाम, हें कां न कळे भजतां सकाम? ते कासया क्षोभले, देवीकडे बोलिले नेई त्वरेनें म्हणोनी?
२४ रामराव लाभादाय, खटला होतां वाटलें त्या भय, गुरुमाय पावली त्यास. जरी घेतली त्यांनीं समाधि, कृपा त्यांची नच जाय कैसें? सद्गुरूसी आम्हांसी भेद काय? मठ स्थापन कां केला?
सप्तम धर्मगुरु – श्रीकृष्णाश्रम
२५ मुल्कीग्रामीं देऊळ बांधाया, कृष्णाश्रमांसी घालावया पाया बोलाविलें; तेव्हां बोधिले जनांस, कांहीं जरी न केलें आपण, तरी कैसें होईल संरक्षण?
२६ नागरकट्टी दुर्गप्पय्यालागून दिधली सप्तशती कराया पारायण, झालें कल्याण त्याचें. सदुरूचें मन निष्ठुर आहे का? भावना-प्रारब्ध एकवटतां गुरुकृपा होण्यांत त्यांचे महत्त्व काय? मोक्ष प्रयत्नानें मिळतो किंवा गुरुकृपेनें? भावना धरितां सद्गुरुकृपा न होय भक्तां?
२७ पांडुरंगाश्रम शिष्य झाले, कंठी पाहिजे म्हणोनि बैसले, शिष्याचे लाड पुरविले. शिष्याचा स्वभाव हट्टी होता का?
२८ पांडुरंगाश्रम-शिष्यप्रेमास्तव ठेविला चैत्रमासीं रथोत्सव. जगासी कैंचा शिकविला स्वधर्म? उत्तमासी शिकविती, अधमासी कां नाहीं? रथोत्सवाकरितां आग्रह धरण्यांत जगाचा काय उद्धार? हल्लीं कां उत्सव टाकिला काढोन?
२९ बाजारकारीं केली निंदा, बाजारा अग्नि लागला, शांत होय शरण जातां गुरुपदा. कासया लागला अनि? शिष्यस्वामींना शेवटला उपदेश, कृष्णाश्रम समाधि.
अष्टम धर्मगुरु – श्रीपांडुरंगाश्रम
३० एक एक अक्षरेंकरोन स्तुति. श्रीपांडुरंगाश्रम यांचा अवतार, केल्या सगुणलीला अपार, गुरुआज्ञेपरी वर्तले निरंतर
३१ स्वामींचं वाक्य सत्य होय शीघ्र. शिराली खेडें केलें शहर केवळ लोकहितासी.
३२ बैंदूर मंगेश यावरी द्वेषे खटला केला, श्रीस्वामींच्या कृपाकटाक्षें पार पडला.
३३ हासगणी कुळकर्णी हिंडला साऱ्या क्षेत्रस्थानीं, समाधान न मिळे, मग स्वामींनीं भेट देऊनि उद्धरिला.
३४ सावकार-सुता जगविलें, बोध केला. गुरूसी भेटती बहुत जन, उपदेश घेती त्यांकडोन, परी कां न फिटे अज्ञान?
३५ गणपत रामजी माने यांची नोकरी गेली, स्वामींसी प्रार्थितां मिळाली.
३६ गोकर्ण शंकर यांसी आपण उपदेश न देतां, अन्यांच्या जपें मुक्त केला. वाक्यमहिमा, ज्ञानियां कां ना पापपुण्य, जरी केलें यथेष्टाचरण तरीही पाप ना कैसें?
३७ मंगेश भट्ट यांची कन्या इजसी सन्निपात झाला, हटेना, गुरुवाक्ये काढा पाजितां जगली. त्यांचे वाक्य इतुकें कासया श्रेष्ठ? जावें जरी गुरुसी शरण, तरी अणुमात्र चुकतां, गति कठीण होईल ना? हातीं काम मनीं राम.
३८ कुंदापुरींचा सावकार कामत त्यावरी मिठाचा आरोप येत, स्वामींसी शरण जातां रक्षिले त्या. जरी प्रारब्धें मिळे, तरी गुरुकृपा काय कारण? सदुरु हा ईश्वर असतां, त्यावरी आणिक ईश्वर कवण प्रारब्ध-रचिता? ज्ञानी हानी न करी प्रारब्धाची, काय कारणें?
३९ दुग्गप्पशेट्टीचा हरिला अभिमान, पुनरपि घोडा गेला घेऊन शरण जाऊन स्वामींसी, गर्व कां हरण केला? प्रसाद केवळ प्रेममय कैसे?
४० अल्लीशा नामें यवन, त्यावरी आलें संकट दारुण, रक्षिला त्याचा भाव बघोन, प्रेम स्वरूप आपुलें कैसें?
४१ अल्लीशावरी पुनरपि संकट ओढवतां, रक्षी सदुरुनाथा; तोचि अंतीं स्वामींसी स्मरत प्राण सोडी. बघतांचि मूर्ति प्रेमळ, उपजे प्रेम अंतरीं, काय कारण?
४२ श्रीस्वामींच्या आशीर्वचनें, राधा राहिली सौभाग्यानें, अभक्तासी दत्तदद्दशनें ओढिला प्रेमबळें, मन हें विषयीं रत, तेव्हां कैंचे नाम येत मनीं?
४३ स्वामी-पांडुरंगाश्रम झाले क्षीण, शिष्य-स्वीकारा प्रार्थिती जन, सद्गुरु म्हणती न करूं आपण. स्वधर्मे वागतां हित तें कवण? परधर्म हा क्लेशकारक कैसें? शिष्यस्वीकाराविषयीं स्वामी निष्ठुर कां दिसले? अन्नाची उपमा स्टुरुलागून कैसी शोभे?
४४ सदुरुस्वामींसी दृष्टान्त होतां, शिष्य-स्वीकारसिद्धता 'करा वेगेंसी', ऐसें आज्ञापिलें, सदुरुवांचोनि अन्य नसतां, प्रेम कैंचें उद्भवे तें?
४५ शिष्य-स्वीकार केला त्वरें, आनंदाश्रम नाम ठेविलें. स्वर्गाचे देव दिसती कां आम्हांसी? बांधोनि ठेविला दंड घट्ट, दोरा तुठला तत्काळ यांत आर्य आहे ते कवण? गुरुस्वामींचा शिष्यस्वामींना आशीर्वाद, गुरुवरें घेतली समाधि, कासया त्यांसी इतुके कष्ट? काय केले जनकल्याण? कासया त्यांसी अनुष्ठान जे असती ब्रह्मज्ञानी पूर्ण? कर्तव्य ही व्याधि कैसी? गुणदोषातील माउली कैसे?
नवम धर्मगुरु – श्रीमदानंदाश्रम
४६ एक एक अक्षरेंकरोन स्तुति. जगीं स्वधर्म रक्षायाकारण अवतार घेई रमारमण,
४७ आनंदाश्रम नाम घेऊनि लीला दावियली, जन्मा येतांचि ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तयां कोठून, ब्रह्मतेज कैंचें तें? "हा घोडा नाहीं कधीही देखिला" काय बामाजी चतुरता? कैसी घडे दिसा अधर्मे?
४८ बहुत अमें विद्याभ्यास केला. खरे साधु कैसे असती? कल्पना नसतां कैसा घडे व्यापार?
४९ एकान्तवास करावा म्हणोन जाती स्वामी ग्राम सोडोन; प्रार्थुनी आणिती भक्तजन, गुरुकृपा झालियाबांचुनी एकरूपभाव ये कैसा? कासया होय मठाचे बंधन? स्वामीसी इतुकें कासया दुःख होय?
५० इरिद्वार-इषीकेशादि क्षेत्रयात्रा करिती; कृष्णाचार्यस्वामींकडोनि केलें श्रवण, कल्पना म्हणजे मिथ्या सारी, ती सद्गुरु कैसेनि?
५१ गुलवाडी अंबाबाईसी पांडुरंगाश्रम-आनंदाश्रम स्वप्नीं भेटले, एकरूपचि आपण ऐसें दाविले. स्वामींसी नसे इच्छा, तरी कासया मठाची चिंता? अवतारिक, तरी त्यासी कैंचे असाध्य म्हणोन पैसा गोळा करावा? पांडुरंगाश्रम स्वामी कडक होते, अपराध होतां क्षोभती, तरी ते अज्ञचि कीं काय? रथोत्सव रहित केला, काय कारण? ठरविला साधन-सप्ताद.
५२. तोंबत बंधुद्धय यांना अनुताप झाला ऐकतां प्रवचना, शरण गेले सद्गुरु-चरणा. कासया जन परमार्थद्दीन जगीं? प्रवचन ऐकती जगीं अनेक जन, सकलांचेंही पूर्ण मन कां न लागे परमार्थी? शांतता जनांच्या अंतरीं कैसी येई?
५३. नारायण शूद्र भक्त खटल्यांतुनी केला मुक्त, सुब्राय भटजी यांप्रत भक्ति उपजली. सुद्गुरूचि सर्वां अधिष्ठान, त्याची सत्ता सकलां कारण, हें कैसें ओळखावें? गुरुवरा भजाया मन उत्सुक व्हावया काय उपाय? सद्गुरुसहवास करितां सहजचि येती सद्विचार कैसे?
५४. मठ स्वामी आमुच्यास्तव, म्हणोनि वर्गणी द्यावी जनांनीं सर्व. स्वामींनी त्रयोदश वरुषांपासून बहुत कष्ट सोशिले, ते कोणते? संसाररूप नदी तरोनि जावया काय करावें? सत्कर्में कैसेनि स्वधर्म होय? सरकार सकलही न देती कर, वर्गणी सकलांनी कां द्यावी? वर्गणी दिल्यानें काय होय आमुचे कल्याण? उत्सव-अभिषेकांत पुण्य काय? सदुरु आले भूतळीं, तरी आम्हीं करावें काय?
५५. गुरुदासाचे सदुरु शिवानंदतीर्थ, यांचे सद्गुण; अवतरले ते साक्षात् दत्त, मोक्षगुरु आणि धर्मगुरु एकरूप असती. आमुचे जातीचे स्वामी असोन, कां जावें अन्य स्थळीं आत्मज्ञानासाठीं आपण?
५६. एक एक अक्षरेंकरोन स्तुति. नऊ आश्रमांसी नमन. सद्गुरुंनीं जनांचा काय उद्धार केला असे? भटजी कासया
ठेविले? भटजींचे वर्णन, श्रीस्वामीचि आम्हां रक्षिती कैसे? साधन-सप्ताहसमयीं रक्षिले जन.
५७. गुरुदासाची माता सौभाग्यें निवर्तली स्वामींच्या आशीर्वादें सकल अध्यायांचे सार. फलश्रुति. सप्ताह करणे कवणे रीतीं? पुण्यप्राप्ति कासयानें होय? गुरुनाथें वदविलें समस्त कैसे?
दशम धर्मगुरु - श्रीपरिज्ञानाश्रम
५८. रेखाटले परिज्ञानाश्रम जन्मचरित्र, जन्मस्थान शिराली तीर्थक्षेत्र चित्रापूर सारस्वतांचे.
५९. कषिले शिष्य-स्वीकार भले परिज्ञानाश्रम नाम दिधले, स्वामी आनंदाश्रमांनी.
६०. संपूर्ण गुरुतत्त्वाचे केले वर्णन, सदुरु महिमा वर्णिला संपूर्ण. समाधीस्थ होती स्वामी आनंदाश्रम.
६१. वर्णिला पट्टाभिषेक सोहळा. स्वामींचा कार्याविषयी सगळा ऋषिला वृत्तान्त.
६२. स्वामी परिज्ञानाश्रम करिती पर्यटन, भक्तांसी धर्मसार उपदेश केला भक्तोद्धार,
६३. स्वामी परिज्ञानाश्रम महानिर्वाण वार्ता. देवी प्राणप्रतिष्ठा जाहला कार्ला ग्रामांतरी.
॥ श्रीगुरुनामावलि ॥
शिव हरि क वसिष्ठ शक्ति पराशरु । कृष्ण हि शुक गौड् गोविंद शंकरू ॥
तोटक हस्तामलक सुरेश्वरू । पद्मपाद आचार्यगुरू ॥१॥
अच्युत आश्रम आनंदहि गुरू । कैवल्य् नृसिंह केशव सद्गुरू ॥
वामन कृष्णहि पांडुरंग गुरू । परिज्ञानांचे पूर्वगुरू ॥२॥
सारस्वतगुरू परिज्ञान् शंकरू । परिज्ञान् शंकर केशव श्रीगुरू ॥
वामन कृष्ण पांडूंगानंद् गुरू । सप्तदशाश्रमपदविधरू ॥३॥
सप्ताचार्य मुनिपंच त्रिदेव् गुरू । गायि हि गुरुनामावलि जो नरू ॥
आनंदाश्रम भवानि-शं-करू । त्या दे सच्चित्सुख आगरू ॥४॥
॥ ॐ तत्सच्छ्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु तत्सत् ॥