मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती

चित्रापुरगुरुपरंपरा - श्रीमत् पांडुरंगाश्रम स्वामींजी आरती

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


ॐ नमो पांडुरंगाश्रम श्री गुरुराया । सद्गुरुराया ।
ओवाळू पंचारती पंचभूत काया ॥ॐ॥
वैराग्य स्नान ज्ञान तिलक जो भाळा ।
नवविधा भक्ती हे नवरत्नांची माळा ।
मुद्रिका अगोचर्यादि क्षात्रजन पाळा ।
दृढ शांती मेखळा झळके विद्युत्ज्वाळा ॥१॥ॐ
पुरुषार्थ सुमनहार तो पाळिला ।
अभिमान धूप हा सारा जाळिला ।
संस्कृतीरूप हा दीप प्रज्वाळिला ।
नैवेद्य भाव शर्करा अर्पूं हर्षाया ॥२॥ॐ
अर्पितो श्रृती मंत्रपुष्प हे माथा ।
गाईन मुखाने अगण्य गुण गण गाथा ।
हे प्रदक्षिणा सत्त्वाची सज्जन नाथा ।
मी दीन होऊनी ठेवितसे पदीं माथा ॥३॥ॐ
किती सद्गुण गाते प्राणी पाळिले ।
दुर्दैव तयांचे सारे जाळिले ।
किती मलीन जन तीर्थाने क्षाळिले ।
भवनदी तारिले शुद्ध करुनिया काया ॥४॥ॐ
श्री गंगाधर गोसावी गुरु हे आदी ।
वंदुनी स्तविता गेली मम उपाधी ।
सज्जन गडी वंदिली त्यांची समाधी ।
लोळे दुर्गादास स्वामींच्या लागलो नादीं ॥५॥
दुष्प्रपंच वृत्ती भोगे ह्या जगीं ।
ह्या ब्रह्मसत्त्वाचा त्रासे धगधगी ।
न संशय व्हावा वंदीतसे तव पाया ।
ॐ नमो पांडुरंगाश्रम सद्गुरुराया । श्री गुरुराया ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP