गणराज दयाळा बा दाखवी चरण ॥
माझे भूकेले लोचन हो पाहावयासी ॥१॥
धेनू जाय वना बा वाट पाहे वत्स सदना ॥
तैसि गत माझ्या मना हो झाली असे ॥२॥
आजुनि कां न येसी बा सखया गणराजा ॥
कवण्या भक्ताच्या बा काजा हो गुंतलासी ॥३॥
दूर धरिसी मजसी आठवावे कवणासी ॥
मिठी मारली चरणासी (पायासी) हो दृढभावे ॥४॥
विनवावे तुज किती बा सखया मंगलमुर्ति ॥
दीन तुज मी काकुलती येत आहे ॥५॥