मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
आहो जोडला मोक्षदाता ॥ भुक...

मोरया गोसावी - आहो जोडला मोक्षदाता ॥ भुक...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


आहो जोडला मोक्षदाता ॥ भुक्ति मुक्ती यासी मागो ॥

आहो तारील हा जन्मोजन्मीं ॥ चरणीं (पायीं) याचे रे राहो ॥

आहो उद्धरीले अनंत कोटी ॥ आह्मा तरी जगजेठी ॥

माझ्या चिंतोबाचा धर्म जागो ॥धृ०॥१॥

आहो चिंचवडीं रहिवास ॥ नाम मोरया देव ॥

आहो पुरवी तो मनकामना ॥ ह्मणूनि चिंतामणी नाम ॥

आहो चिंता माझी हरीं देवा ॥ चुकवी जन्म यातना ॥माझ्या० ॥२॥

आहो अज्ञान बाळ तुझें देवा ॥ आलो तुझिया ठायां ॥

आहो कृपा करी देवराया ॥ लावी आपुल्या पायां ॥

आहो न साडी बा चरण तूझे ॥ आणिका ठायासीं नव जाये ॥माझ्या० ॥३॥

अहो बुद्धिहीन पांगूळ मी ॥ आलों तुझिया ठायां ॥

अहो नुपेक्षीं तूं देवराया ॥ देंई भक्ती सोहळा ॥

अहो मन माझें गुंतलेंसें ॥ कोठें नव जाय देवराया ॥माझ्या चिंतो० ॥४॥

अहो मजवरीं कृपा करीं ॥ सेवा आपूली घेंई ॥

अहो चिंतामणी गोसाव्यांनीं ॥ कृपा (दया) मजवर केली ॥

अहो कृपे (दये ) स्तव जोडी झाली ॥ गेल्या पापाच्या राशी ॥माझ्या चिंतो० ॥५॥

अहो आणिक एक विनंती ऐक ॥ भक्ता तारीं तूं सनाथ ॥

अहो कृपा (दया) मज बहुत करी ॥ विनवी नारायण दीन ॥

अहो चरणा पासून न करीं दुरी ॥ चरण (पाय) धरिले दृढ भारी ॥

माझ्या चिंतोबाचा धर्म जागो ॥ याचे चरणीं लक्ष लागो ॥६॥

याची सेवा मज घडो ॥ याचें ध्यान हृदयीं राहो ॥

माझ्या चिंतोबाचा धर्म जागो ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP