मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
पूजा प्रांत आरंभीला ॥ विघ...

मोरया गोसावी - पूजा प्रांत आरंभीला ॥ विघ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


पूजा प्रांत आरंभीला ॥ विघ्नराज संतोषला ॥१॥

तुह्मी चलावें चलावें ॥सिद्धि बुद्धि मंदिरासीं ॥धृ०॥

उद ऊदउनियां मंदिर ॥ लिहिलें चित्र हें सुंदर ॥तु०च०॥२॥

रत्‍नजडित मंचकावरी ॥ शोभे भूपती सुंदरी ॥तु०च०॥३॥

वरी पासोडा क्षीरोदक ॥ शोभे अनुवार अनेक ॥तु०च०॥४॥

लाऊनियां रत्‍नदीप्ती ॥ सेवेलागिं उभ्या शक्ती ॥तु०च०॥५॥

मुक्ताफळाचा चांदवा ॥ वरी बांधिलासे बरवा ॥तु०च०॥६॥

सूगंध द्रव्यें सिद्धी हातीं ॥ चरणा संव्हा लागे बुद्धी ॥तु०च०॥७॥

सुगंध द्रव्य हें आणुनी ॥ तुज समर्पाया लागुनी ॥तु०च०॥८॥

पायघडीया लागीं शेले ॥ त्यासीं कस्तुरी परिमळ ॥तु०च०॥९॥

करुणा वचनी विनवीले ॥ महाराज संतोषलें ॥तु०च०॥१०॥

येउनि मंदिरीं पावले ॥ भक्त आज्ञा हे लाधले ॥तु०च०॥११॥

महाराज मंचकावरी ॥ बैसुनि सखें निद्रा करी ॥

तुह्मी पहुडावें पहुडावें ॥ सुखें सुमन शेजेवरी ॥१२॥

सिद्धि बुद्धि चरण चुरी ॥ दिनासी तांबुल दिधला करीं ॥

तुह्मी पहुडावें पहुडावें ॥ सुखें सूमन शेजेवरी ॥१३॥

घेऊन पादुका शिरीं ॥ उभा नारायण द्वारीं ॥

तुह्मी पहुडावें पहुडावें ॥ सुखें सुमन शेजेवरी ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP