मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
माहेर हो माझे ऐका हो साजण...

मोरया गोसावी - माहेर हो माझे ऐका हो साजण...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


माहेर हो माझे ऐका हो साजणी ॥

गाईन मी तेही हो वेळोवेळा ॥

सिद्धी बुद्धी माता गणराज पीता ॥

षडानन चुलता हो आहे मज ॥२॥

आजा महादेव आजी ती भवानी ॥

नारदा हा मुनि हो मातूळ हो ॥३॥

मातामह माझा हो ब्रम्ह देव जाणा ॥

कश्यप हा मामा हो आहे मज ॥४॥

लाभ लक्ष दोन्ही बंधू हे साजीरे ॥

काशिराज तिसरा हो आहे मज ॥५॥

भुशुंडि हे ऋषि मुद्गल महामुनि ॥

मोरया गोसावी हो भक्त जाणा ॥६॥

अनंत हे भक्त हो असतिल देवराया ॥

तयामाजी सिद्ध हो हेचि जाणा ॥७॥

चिंतामणीदास हो हेंचि हो मागत ॥

जन्मो जन्मी हेंचि हो देई मज ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP