संसारा घालूनि देवा मज कां रे कोपलासी ॥ काय अन्याय म्यां केले ॥
मज कां तूं विसरलासी ॥ देह (प्राण) गेला माझा व्यर्थ ॥
तूं कैसा दिनानाथ ॥ झणि न लावि तूं उशीर ॥ उतरीं तूं पैलपार ॥१॥
धावें धावें बा मोरया ॥ जाऊं कोणा बोभावया ॥
त्रास करीं या कर्माचा ॥ नेण मी आणिक दुजा ॥धृ.॥
आत काहीं हें मज नलगे ॥ पुरले देहे सुख ॥
पीडा केली या प्रपंची ॥ तेणें भय संसाराचे ॥
पुढती न ये मी येणें पंथा ॥ भव दुःख तोडी व्यथा ॥
कोणा जाऊं मी शरण ॥ नेणें मी तुजवाचून ॥३॥
कृपा सिंधू तूं ह्मणविसी ॥ मज दीना उबगलासी ॥
कोठें जावें म्या कृपाळा ॥ विनवितो तुज दयाळा ॥
मन माझें व्याकूळ झालें ॥ दाखवि मज पाउलें ॥
मनोरथ माझे पुरवी ॥ ह्मणे दास चिंतामणी ॥ धावें धावें बा मो०॥४॥