मोरया तैसे माझें मन (अरे) तूज कारण ॥
मोरया हो तैसें माझें मन ॥धृ.॥
घन देखुनि आंबरी ॥ कैसा आनंद मथूरारे ॥१॥
भानू असतां मंडळी ॥ प्रीति विकासिती कमळे रे ॥२॥
मेघ वर्षे भूमंडळी ॥ हर्षे बोभाया चातक रे ॥३॥
शशि देखुनि चकोर ॥ तृप्ती पावति अंतःकरनी रे ॥४॥
बापा जळाविण मीन जैसा ॥ तळमळी मानसी रे ॥५॥
बापा कुसुमा वेगळा रे ॥ भ्रमर विश्रांति न पावे रे ॥६॥
बापा तनुमन:विश्रांत ॥ मज नावडे घरदार रे ॥७॥
मोरया गोसावी मानसी ॥ तुज ध्यातो विघ्नहरा रे ॥
मोरया तैसें माझें मन ॥८॥