मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
आजि आनंद आनंद ॥ मज भेटला ...

मोरया गोसावी - आजि आनंद आनंद ॥ मज भेटला ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


आजि आनंद आनंद ॥ मज भेटला एकदंत ॥धृ०॥

धन्य दिवस सोनियाचा ॥ पाहुं देव हा दैवाचा ॥आज० ॥१॥

आनंद झालासे मही ॥ नाम जपा सकळही ॥

मोरया मोरया घोष ॥ करितां नासती क्लेश ॥आज० ॥२॥

जन्म फेरे चकावया ॥ नाम जपा रे मोरया ॥

भव सिंधु तरावया ॥ द्वारें जाऊं करावया ॥आज० ॥३॥

महायात्रेचा आनंद ॥ मोरेश्वरीं ब्रह्मानंद ॥

टाळ घोषाच्या गजरें ॥ रंगीं नाचूं बहु आदरें ॥आज० ॥४॥

चिंतामणी मायबाप ॥ दाखविले आपुले कृपें ॥

प्रतिमासीं दर्शन॥ चुकवि जन्म मरण ॥

आज आनंद आनंद ॥ मज भेटला० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP