मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
थेऊर गांव तेथें देव चिंता...

मोरया गोसावी - थेऊर गांव तेथें देव चिंता...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


थेऊर गांव तेथें देव चिंतामणी ॥

नांदे इच्छादानीं हो मोरेश्वर ॥१॥

अहो अकळु अवतार देव लंबोदर ॥

प्रत्यक्ष मोरेश्वर हो नांदतसे ॥२॥

अहो महाउग्रस्थळ राहिले गजानन ॥

दीन भक्त जन हो तारावया ॥३॥

अहो पाहुन शुद्ध स्थळ अवतार निर्मळ ॥

भुक्ति मुक्ति तात्काळ होईल तेथें ॥४॥

अहो मोरया गोसावी करी निजध्यास ॥

प्रत्यक्ष विघ्नेश हो हृदयीं त्याचे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP