हें मन वेधलें हो (आहो) मोरयाचे ध्यानीं ॥
आणिक नावडे ह्या मोरयावाचोनी ॥
कथा मोरयाची (आहो) सांग माझें कानी ॥
नाहितर (जिवासी) प्राणा होउं पाहे हानी ॥१॥
मज हांसतिल (आहो) परि हो हांसोत ॥
परि मज सांगा ह्या मोरयाची मात ॥
तेणें मनचे हो (आहो) पुरलें आरत ॥
नाहितर (जिवासी) प्राणा होउ पाहे घात ॥२॥
या हो जनासि (आहो) काय मज काज ॥
दिनानाथ कृपाळु महाराज ॥ एकदंत हो (आहो) सुंदर चतुर्भूज ॥
तोचि (हाचि) हृदयीं आठवतो मज ॥३॥
त्रैलोकीं हो व्यापक गजानन ॥ सुंदर (बाह्य) लागले ह्या मोरयाचें ध्यान ॥
कांहीं केलिया हो (आहो) न पुरे तें मन ॥
वृथा कासया कराल समाधान ॥४॥
देह विनटला (आहो) मोरयाची सोय ॥
तयासि प्रतिकार न चले हो कांहीं ॥
मोरया गोसावी (आहो) एक रुप देहीं ॥
दीन रंक मी रुळे त्याचे पायीं ॥५॥