मन माझें वेधलें गणराजीं ॥
वृत्ति बैसली तुझें पायीं ॥धृ०॥
आहो वृथा माया लावली हो कां मज बहु भारी ॥
मोहा पासुनी सोडवावे अरे तुज ह्मणे एक भावे ॥मन माझें० ॥१॥
पुत्रदारा धनादिका ॥ चाड नाहीं जन लोका ॥
शरण कोणा जाऊं आणि का ॥ अरे तूं मजवरी करी कृपा रे ॥मन माझें० ॥२॥
पतित पावन नाम तुझें आहे रे त्रयलोकीं ॥
ब्रीदावळी साच केली अरे मज थोर जोडी जाली ॥३॥
भ्रमर मन आहे हो लब्ध तुझें पायीं ॥
सुगंधित वास आला आयागमन खुंटलें रे ॥॥मन माझें० ॥४॥
दास तुझा विनवितो चिंतामणी देव ॥
दीनरंका तारि वेगीं त्यासी लावी मुक्ति मार्गीं ॥मन माझें० ॥५॥