न विचारी गुणदोष ॥ लाऊनि कासेसीं ॥
उतरीं पैलथडी क्षणमात्रे ॥१॥
अहो भवसागर डोहो ॥ दुस्तर हा जाणा ॥
मोरया गोसावी तारील तेथें ॥२॥
अहो ह्मणोनि आवडी ॥ लागलीसे तूझी ॥
मोरया गोसाव्यावीण नेणें ॥३॥
अहो चिंतामणी देव ॥ पाहे हो नयनीं ।
तेणें सर्व सिद्धि पावतील ॥४॥
अहो ऐशा त्या हो मुर्ती ॥ हृदयीं धरुनी ॥
जप तोही त्याचा करुनियां ॥५॥
अहो चिंतामणी दास ॥ स्मरें नित्य त्याला ॥
आणीक दुसरा देव नेणें ॥६॥