मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
भिमातटीं स्थळ भूमी सिद्धि...

मोरया गोसावी - भिमातटीं स्थळ भूमी सिद्धि...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


भिमातटीं स्थळ भूमी सिद्धिटेक॥

तेथें प्रगट जाला विनायक ॥१॥

महाविष्णू पती धरीला अवतार ॥

सकळ देवाचा तूं हो जेष्ठराज ॥२॥

गणेश मंत्र जप केला हो विष्णूनें ॥

त्याची कार्य सिद्धी हो जाली तेथें ॥३॥

मधुकैटभ दैत्य वधीला ततक्षणीं ॥

ऐसा प्रताप गणेश नामाचा ॥४॥

महासिद्ध स्थळ नांदे विनायक ॥

करी भक्ताची सिद्धी निरंतर ॥५॥

निरंतर ध्याये मोरया गोसावी ॥

तेणें आम्हां जोडले गणराज ॥६॥

त्याचे जगन्नाथ विनवी गजानन॥

त्यासी देंई नाम ध्यास हो एकरुप ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP