अहो कलीयुगा माजी एक ॥ मयूर क्षेत्र बा ठाव ॥
अहो मोरेश्वर दाता जाण ॥ दिनरंकेचा राव ॥
अहो ईच्छिलें फळ देतो आहे ॥ मोक्षपद ऊपाव ॥१॥
माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥धृ॥
चौर्यांसीं बा लक्ष गांव ॥ पंथ अवघड भारी ॥
अहो तितकाही उल्लंघूनीं ॥ वास केला मयूरपूरीं ॥
अहो चुकतील यातायाती ॥ तरसील भवसागरीं ॥
माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥२॥
माझा मोक्षदाता तुंचि एक ॥ ह्मणूनी शरण रिघालों ॥
अहो कल्पवृक्ष देखोनीयां ॥ परम सुख पावलों ॥
अहो विश्रांति बा थोर झाली ॥ भक्ती दान लाधलों ॥मा०मो०॥३॥
माझा देह हा पांगूळ हो ॥ बापा आलों तुझीया ठाया ॥
अहो कृपा (दया) दृष्टी पाही मज ॥ शरण तुझायी पायां ॥
अहो कृपाळ (दयाळू) बा तारीं वेगीं ॥ भक्त (दीन) वत्सल देवराया ॥
माझ्या मो० धर्म जागो ॥४॥
अहो अनंत रुपें अनंत नामें ॥ तेथें वर्णा (बोला) वें काय ॥
अहो योगीयांचा निजध्यास ॥ मोरयागोसावी ध्याये ॥
अहो युगानयुगीं जोडी झाली ॥ विघ्नराचें (मोरेश्वराचें) पायीं ॥
माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥
याचे चरणीं लक्ष लागो ॥ याची सेवा मज घडो ॥
याचें ध्यान हृदयीं राहो ॥ माझ्या मोरयाचा धर्म जागो ॥५॥