मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
निळकंठा परशुधरा ये ये हा ...

मोरया गोसावी - निळकंठा परशुधरा ये ये हा ...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


निळकंठा परशुधरा ये ये हा शक्ति श्रीवरा ॥

प्रभा करा एक भावे अर्चन करावें ॥

पंचमूर्तिच्या ठाईं ज्यानें ये ये हा द्वैत धरिलें ॥

आपुलें कर्मे करुन त्यानें नरक साधिलें ॥१॥

वरेण्या ते स्वमुखें करुनी ये वे हा गीता सांगितली ॥

उत्तम योगाची ती खूण तेथें जाणविली ॥२॥

गजानन अनंत रुपीं ये ये हा आहे कीं साचा ॥

मायाजाळे मंद मतिसी अनुमान कैचा ॥३॥

यास्तव तुजला प्रार्थितो ये ये हा मना समजावे ॥

गजाननाचे सर्व भावे नामचि वदावे ॥४॥

योगादिक साधनें ये ये हा कशास करावे ॥

स्वल्प प्रयत्‍ने नित्याभ्यासे मुक्ति सेवावे ॥५॥

मोरया गोसावी यांचे ये ये हा वंशि किंकर ॥

धरणिधर वरद कृपेनें सुखि निरंतर ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP