|
पुस्त्री . १ वस्तु ; पदार्थ ; ( विक्रीचा , खरेदीचा ) माल ; चीज . २ कोणतीहि एखादी वस्तु ; कांहीं एकिअ पदार्थ . त्याणें तुम्हापाशीं जिन्नस ठेविली आहे ती द्या . ३ जात ; प्रकार . ४ क्षुद्रवस्तु ; क : पदार्थ . जिवबा बोले गर्जुन मोंगल काय आणिला जिन्नस । - ऐपो २५८ . [ अर . जिन्स ] ( वाप्र . ) एकजिनसी - वि . १ एकाच जातीचा किंवा वस्तूचा . २ अगदीं एकसारखा , एकाच प्रकारचा . ०उडविणें खर्चून टाकणें . सामाशब्द - ०अजनास स्त्री. पदार्थ ; माल ; वस्तु . मशार्निल्हे या जिन्नस अजनाशीच्या तलाशांत शोधांत आहे . - ऐटि ३ . ६५ . [ अर . अज्नास = जिन्सचें अव ] ०खाना पु. कोठार ; तळघर ; वखार ; सामान सांठविण्याची जागा . - वाडबाबा २ . ४२ . [ फा . ] जिनसाजिनसी - वि . हरतर्हेचें . जडिताचा शृंगार कोंदणें हिरे हरजिनसाजिनसी । - अफला ५४ . ०दार वि. आंत जिन्नस ( पुरण ) घालून तयार केलेली ( रोटी ). - गृशि २ . १४ . ०पानस पु. १ अनेक प्रकारचा जिन्नस ; सामानसुमान ; हरजिन्नस . २ कोठारांतील सामान . ०भाव पु. बाजारभाव . ०वर्ताळा पु. धारा धान्यरूपानें भरावयाचा असेल तेव्हां भारी जातीच्या धान्याच्या बदला हलक्या जातीचें धान्य जास्त प्रमाणांत घेतात , तें जादा प्रमाण , माप ; भारी धान्याच्या मोबदला वर्तावळा . ०वार वि. १ निरनिराळयातर्हेचें ; पुष्कळ जातीचें . एकाच जातीचीं फुलें नको , जिन्नसवार घेऊन ये . २ सुबक ; चित्रविचित्र ; अतिशय चांगलें ; उत्कृष्ट ; भारी दर्जाचें ( माल , कापड ). एकादें जिनसवार चीट आढळल्यास आंगरख्यासाठीं घेऊन या . ३ प्रत्येक मालागणिक ठेवलेला ; दर जिनसाचा निर्देश केलेला ( हिशोब , कागद ) जिन्नसवर याद लिहून दे म्हणजे तो आणील . ४ पिकांसंबंधीं स्वतंत्र तक्ता . जिनस वार जमाबंदी = प्रत्येक जातीच्या पिकावर बसविलेल्या धार्याचा तपशीलवार तक्ता . जिन्नसाना , जिन्नसजिन्न्साना , जिन्साना - वि . उच्चदर्जाचा ; खरा . जिन्नसवार अर्थ २ पहा . - पु . माल ; सामान ; कोठारी माल . तेथें सरकारचा जिन्साना आहे त्याची मोजदाद त्यास देऊन पावती घेणें . - रा १२ . १३६ . जिनशी , जिन्नशी , जिनसी , जिन्नसी - वि . १ मालाच्या वाहातुकीचें ( जहाज ). २ बारदान , भरताड भरलेलें ; जिन्नस भरून आलेलें . जिनशी - स्त्री . कोठार ; जिन्नसखाना . तीन तोफा व बारूदचे पेटारे बारा आणिले होते ते जिनशींत दाखल करविले . - रा ५ . १९४ . जिन्नसी गलबत , जिन्नसी गलबतारु - स्त्री . माल वाहावयाचें तारू - गलबत . जिनसीवाले - पुअव . तोफखान्याचा अधिकारी . जिनसी सामान - न . दारूगोळा ; तोफ खान्याचें सामान .
|