घटका दो घटकेचें ईशभजन खंड, काय कामाचें ॥
मोक्षप्रद कीर्तन जें सतत, भजन वा अखंडची प्रभुचें ॥१॥
दो घटाका भजन, पुढें कदन रुदन हाच तो प्रपंच असे ॥
याहुनि प्रपंच सारा, भजनानें रंगवू नये कैसें ॥२॥
येतां, जातां, उठतां, बसतां, कीं सर्व कार्यही करितां. ॥
देतांम घेतां, वदनीं वदतां, तैसेच ग्रासही गिळतां ॥३॥
दारीं, घरीं वनीं वा रतिसमयीं सर्व लाज सोडोन ॥
चिंतन प्रभुचें करणें, जाणावें तें अखंड हरिभजन ॥४॥
काया-मन-वाचेनें, बुद्धीनें, कर्म प्रकृति-अनृसार ॥५॥
घडलें शुभाशुभादिक अर्पण प्रशुसीच, हें भजनसार ॥
जें जें केलेंम करिशिल, करितोसी तें म्हणें ‘न मी केलें’ ॥६॥
स्मरण असो दिनरजनीं, प्रभुसत्तेनेंच सर्व हें चालें ॥
सत्तेनेंच तयाच्या, उगवे मार्तंड वायु वाहतसें ॥७॥
जल वर्षे, भू देई धान्य, फलें वृक्ष, स्मरत जा ऐसें ॥
बघतों डोळ्यानें, रव कानीं, चालों पदीं, करें कर्म ॥
बोलों मुखे, जिभेने रस चाखों, ही प्रभूकृपा परम ॥८॥
खावें, प्यावें, ल्यावें, सर्व जमाखर्च श्रीहरी नांवें ॥९॥
म्हणजे सुटलास गडया, भर्जित बी पेरितां कधीं नुगवे ॥
मी नच कर्ता ऐशा भावें, जें कर्म, कर्मसंन्यास ॥१०॥
त्रैलोक जाळितांही साधे नैष्कर्म्य, बाध ना त्यांस ॥
नामस्मरण खरें हें, हेंच भजनही अखंड त्या प्रभुचें ॥११॥
अर्पण करी तयासी, ‘मी कर्ता’ वदुं नको कदा वाचे ॥
स्मरणें हरिच्या, जागर वा स्वप्नामाजील कर्म, हरिभजन ॥
गाढ सुषुप्ती, हरिची शुद्ध समाधीच, मीपणेंवीण ॥१२॥
रज्जूचें स्मरण जरी, सर्पाचा भास काय भिववील ॥
स्मरतां नित्य हरीसी, करि माया काय, फोल जंजाल ॥१३॥
अभ्यास नित्य करितां चाळा हा सकल इंद्रियास जडे ॥
हरिचें भजन अखंडित, तीन अवस्थेंत सर्व काल घडे ॥१४॥