मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आई

वेदांत काव्यलहरी - आई

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


माता ही भक्तीची, ज्ञानाची ओतली जणू मूस ॥
वैराग्याची पुतळी, विधि निर्मी वाटते मनीं खास ॥१॥
भक्ती ज्ञान शिकाया, वैराग्याचे तसे धडे घ्याया ॥
ग्रंथ कशास, गुरू वा अन्य, गुरू एक मायची राया ॥२॥
भक्तीप्रेमसुखाचा करिते वर्षाब जी शिशूवरती ॥
त्याच्या सुखदु:खाचें ज्ञान जिला पूर्ण, एक आई ती ॥३॥
बालक सुखी असावा, म्हणुनी सर्वस्व जी करी त्याग ॥
ती आई; प्रेम तिचे ज्यावरती बाळ तें महाभाग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 17, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP