मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
शेजारती

वेदांत काव्यलहरी - शेजारती

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


शेजारती
चाल --- भैरवी [भजनबिना जलजयो]
ज्ञानघना, निज निज गुरुराणा ॥धृ०॥
भास जगाचा झोंपसि जेव्हां-उठता गिळिशी जगत खुणा ॥१॥
कोठिल निद्रा जाग तुला प्रभू-होशि कधीं ना अधिक उणा ॥२॥
होसी तूं जग, हेम जसे नग-नच मुकता तिळ हेमपणा ॥३॥
समुख अपणा आपण दर्पणीं -- जगतभिषें बघसी अपणा ॥४॥
द्दश्य जगत, द्रष्टा दर्शनही -- अवघाची तूं त्रिपुटिविना ॥५॥
स्वयं आयता सिद्धराम प्रभू -- दत्तात्रय तुज करि नमना ॥६॥

शेजारती
चाल --- (नच सुंदरि करु कोपा)
सिद्धराम गुरुराणा -- नीज अतां धरि भौना
शीण बहू तुज झाला -- सेवि प्रभू सुखशयना ॥धृ०॥
मंत्र तंत्रही जपले -- वेद चारही पढले ॥
योग याग किति केले -- कष्ट करुनि बहु खपले ॥
मूढ अशा सकलांना -- लाविलेसि निजभजना ॥१॥
अज्ञानी जन भुलले -- सुपथ दिसेना चुकले ॥
देव पाहाया फिरले -- तीर्थव्रता अनुसरले ॥
देहीं परि देव तुंवा -- दाखविले भक्तांना ॥२॥
भवसागर आटविला -- शीणभार ओसरिला ॥
घालवुनि बुद्धिमला -- दिधले निजज्ञानाला ॥
दत्तात्रय दास तुझा -- मानीना अन्य कुणा ॥३॥
टीप :--- खालील प्रमाणें ध्रुवपद बदलून काकडारती म्हणावी --
सिद्धराम गुरुराणा -- ऊठ प्रभो ज्ञानघना ॥
भक्त दर्शना टपले -- सोडि अतां सुखशयना ॥

शेजारती --- चाल --- (धनराशी दिसता)
निज निज गुरुराणा । सच्चितसुख जगकारणा ॥
जग कारणा । जग धारणा ॥धृ०॥
चाल :--- कळशि न कोणा कोण कसा तूं ।
काय तुझा जगविलास हेतू ॥
विचित्र रचना, अघटित घटना,
नाकळे, श्रुतिही चळे, तव वर्णना ॥१॥
अतर्क्य तूं, त्यापरि तव लीला ।
आकळितां येइ न मम बोला ॥
थकली रसना, कळशी न मना ॥
अज्ञ या, दत्तात्रया, दे दर्शना ॥२॥

काकडारती :--- “निज निज” ऐवजीं “उठि उठि” घालून,

शेजारती --- चाल --- (सत्य वदे वचनाला.)
निज निज रे गुरुनाथा आता,
उशिर तुला बहु झाला तातां ॥धृ०॥
चाळ :--- सुखनिद्रा तव योगसमाधि । नीद तया
म्हणतो नच कळता ॥१॥
प्रगट सदोदित नीद कशी तुज
दत्तात्रय लटकेचि निजविता ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP