मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आत्मभजन

वेदांत काव्यलहरी - आत्मभजन

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


आत्मभजन
[पद --- [नई जोबनवाली]
प्रीति असो दे ईश्वरभजनीं ॥धृ०॥
चाल :--- देखवि बोलवि एक जनार्दन । चेष्टवि इंद्रिय अंतरि राहुनी ॥१॥
नसतां नारायण ह्रद‌भुवनीं, प्रेत तया नच शिवती कोणी ॥२॥
स्मरता हाच प्रभू दिनरजनी, लखचौंर्‍याशी चुकती योनी ॥३॥
==
संक्रांतीचें स्वरूप.
पद --- (श्रीजगदीशा स्मरुनी)
जीवदशा संक्रांती । आली कोठुनि आत्म्यावरती ॥धृ०॥
चा० आवरणात्मक वस्त्रें ल्याली । विक्षेपानें बहुधा नटली ।
सुखशांतीसी खाउनि धाली ।
अज्ञानावरि बसली । हिडे पाहत सार्‍या जगती ॥१॥
कोण कशी ही पाहूं म्हणतां । न दिसे, धरितां येइ न हातां ।
नाहिं म्हणो तरि भ्रमवी जगता ।
दुर्धट माया-सत्ता । न चले परि ती ज्ञान्यावरती ॥२॥
==
तिळगुळ
पद --- (जयजय आलख निरंजन)

तिळगुळ घ्या हो, अमुचा घ्याहो । सेवन करिता, जाइल तळमळ ॥धृ०॥
चाल :--- गोड गुळासम प्रपंच मानी । स्नेह तिळासम ठेवी प्राणी ।
सेवन करिता हरिल मनोमल ॥१॥
स्नेह प्रपंचीं, मी-मम जोडी । हीच संक्रमण दुर्घट जोडी ।
सेवन करिता, मी-मम हतबल ॥२॥
ग्रासुनि जोडी, तोडि आपदा । दाखवि त्यासी मार्ग गुरुपदा ।
सेवन करितां काढिल भव पळ ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP