मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
प्रकृति प्ररुषवन्दन

वेदांत काव्यलहरी - प्रकृति प्ररुषवन्दन

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


भेद तरी नच होता एकपणामाजि द्वैत आभास ॥
सत्तारूप पुरुष तो, ज्ञानाचा भास प्रकृतिचा वास ॥१॥
येथेंच जगतसंधी, एकासी जाणणे दुजे एक ॥
त्या जाणण्यांत उपजे जगत, असे काय याहुनि अणिक ॥२॥
पुरुष नटे स्त्रीवेषें, रूप बघे आरशांत मग अपुलें ॥
सुंदर स्त्रीवेष दिसे, पाहुनिया आपआपणांस भुले ॥३॥
या पुरुषासी होई कामोद्भव, बघुनि आपुलें रूप ॥
वीयर्पपतन झालें, या संधीमाजींच उगवलें पाप ॥४॥
निरुपाधिक पहिला जो, तोचि बने ज्ञेय आणि ज्ञाताही ॥
द्वैत उपाधी अपली अपणासी, होउनी रमे पाही ॥५॥
मावळलें मी तूंपण, शिवपूजा शिवचि येथ होवोन ॥
वंदन प्रकृती-पुरुषां, एकपणा मोडिता न, ही खूण ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP