वेदांत काव्यलहरी - विषयमोह
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
पद --- (नियम पाळावे)
संग विषयाचा । उपजवी काम मनिं त्याचा ॥धृ०॥
चाल :--- कामांनतर क्रोध उद्भवे । क्रोधांतीं संमोह संभवे ।
स्मृतिविभ्रम त्यांतची डोकावे ॥
नाश बुद्धीचा । मार्ग हा सर्व नाशाचा ॥१॥
गोष्ट आठवे मज कोल्ह्याची । सुरंगफल आवड खाण्याची ।
परि फल खातां त्रेधा त्याची ।
वैराग्याचा । झटका ये त्याग फळाचा ॥२॥
जातां सहजीं झाडाजवळुनि । फळ नुसतें पाहतांच नयनीं ॥
फक्त ठेवितां मुखीं न हानी ॥
एकचि कैचा । खादल्या त्रास हो त्याचा ॥३॥
यापरि खातां एक अनावर, । काम वाढला फार भयंकर ॥
खाउनि पुष्कळ झाला जर्जर ॥
मोह विषयाचा । सर्वस्व नाश जीवाचा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2014
TOP