वेदांत काव्यलहरी - ऐने महाल व कुत्रा
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
(शार्दूलवि०)
ऐने मंदिर त्यांत एक शिरला, एके दिनीं तो शुनी ॥
पाहोनी प्रतिर्बिब त्यांत आपुलें, मेला जसा भुंकुनी ॥
तैसें आपण एक, मानुनि दुजे नानापरी पाहतों ॥
विश्वाचें भय वागवूनि स्वमनीं, दु:खें किती भोगतों ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 17, 2014

TOP