वेदांत काव्यलहरी - राजा हा ईश्वर नव्हे
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
स्वर्ग नरक तुमचा तो ईश नसे; भूप तोच कीं ईश ॥
चार्वाक म्हणे नियमी भूप प्रजा, ये जसे मना त्यास ॥१॥
झाला प्रसन्न देई बक्षिस, जरि रुष्ट भूप दे शिक्षा ॥
स्वर्ग नरक येथेची, सुख एका, मागतो दुजा भिक्षा ॥२॥
सिद्धांती त्यास म्हणे पाहू जुळवून लक्षणें आतां ॥
ईशाची जरि जुळली रायासी, ईश त्यास ये म्हणतां ॥३॥
क्लेशानें, कर्मानें, हेतूनें व्यापला तुझा भूप ॥
अक्लेटा, अकर्मा तो ईश्वर निष्काम, समज रे खूप ॥४॥
भय रोगग्रस्त राजा, संरक्षक आणि औषधी त्याला ॥
लागे सदा; परंतू निर्भय, निरवद्य ईश उमज खुळा ॥५॥
किंचिज्ञ तुझा राजा, ईश्वर सर्वज्ञ सर्व ह्रदयस्थ ॥
ईश्वर स्वतंत्र, परवश भूप, जया एक नेमिला प्रांत ॥६॥
ऐसे विरुद्ध लक्षण, एकाचें जुळत नाहि दुसर्याला ॥
स्पष्टचि असुनी ऐसे, अविचारें ईश म्हणशि रायाला ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 17, 2014
TOP