वेदांत काव्यलहरी - त्यांत काय पंचाईत ?
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
पद --- (जमका अजब तडाखा बे) (वाहवा वैभव ज्ञानाचें)
आतां पंचाइत, कसली । तळमळ भ्रांति सकल मिटली ॥धृ०॥
चाल :--- त्यांत काय पंचाइत जरि हा देइ राहिला गेला ॥
स्थूल देह मी नव्हे, कशीही कर्में जरि ती घडलीं ॥१॥
त्यांत काय पंचाइत, जरि मन बुद्धयादिक हे भ्रमले ॥
अथवा रमले हरिगुण गानीं, मजहुनि सर्व निराळीं ॥२॥
त्यांत काय पंचाइत, वृत्ती निजली कारण शरीरीं ॥
महाकारणीं जरी “ब्रह्म मी” म्हणुनी जागत बसली ॥३॥
मला जाग ना निद्रा, मी तरि वृत्तीहून निराळा ॥
दत्तात्नय ऐकतो सदा ही किसनसिंगची बोली ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2014
TOP