मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
वारा पाणी मुसळ धारा । तेण...

संत जनाबाई - वारा पाणी मुसळ धारा । तेण...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


वारा पाणी मुसळ धारा । तेणें मोडिलें छपरा ॥१॥

मग विठाई धांवली । हातीं चक्र धांवत आली ॥२॥

वासे लाविले चौफेर । क्षणामध्यें केलें घर ॥३॥

जागा झाला नामदेव । द्वारीं उभे पंढरिराव ॥४॥

डोयीं ठेवून पायांवरी । दासी जनी चरण चुरी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP