हांसें आलें द्रौपदीसी । बापा वचन परियेसीं ॥१॥
सर्व अरिष्ट भंजना । तुजलागीं बाहों कोणा ॥२॥
एक भाव तुझे पायीं । यावेगळें कांहीं नाहीं ॥३॥
थाळी माजी पाहतां अन्न । होय क्षुधेचें हरण ॥४॥
थाळी दाखवी देवासी । कैंचा विश्वास तुजसी ॥५॥
धांडोळितां कष्टें बहुतें । किंचित शाखापत्र तेथें ॥६॥
निर्मी कैवल्याचा दानी । म्हणे नामयाची जनी ॥७॥