थालीपाक ऐकतां । हरि वारी जन्मव्यथा ॥१॥
दुर्योधनाच्या घरासी । आला दुर्वास हो ऋषी ॥२॥
सेवें बहुत तोषविला । वर माग तूं इच्छिला ॥३॥
शिष्यासह रानीं जावें । इच्छाभोजन मागावें ॥४॥
अंतर शाप द्यावा । आतां जातों वर द्यावा ॥५॥
हर हर शब्द थोर केला । झाला वनांत गलबला ॥६॥
नवल सर्वांसी वाटलें । जनी म्हणे ऋषि आले ॥७॥