मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
करचरण प्रक्षाळुनीं । उभी ...

संत जनाबाई - करचरण प्रक्षाळुनीं । उभी ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


करचरण प्रक्षाळुनीं । उभी ठेली वृंदावनीं ॥१॥

जोडोनियां करकमळ । म्हणे धांवरे गोपाळ ॥२॥

कृष्णा पाहतोसी काय । सत्वहानि होत आहे ॥३॥

ऋषि स्नानासी कोपिष्‍ट । गेले सांगोनियां स्पष्‍ट ॥४॥

दिवसा कर्माचा उगाणा । सर्व सारोनियां जाणा ॥५॥

आतां येतों शीघ्र गती । अन्नें वाढा पात्रावरुतीं ॥६॥

अन्न न देखतां डोळां । भस्म करीन सकळां ॥७॥

गेला घालोनि संकटीं । लाज राखें जगजेठी ॥८॥

कोणी नाहीरे निर्वाणीं । म्हणे नामयाची जनी ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP