म्हणे पाचारा भूदेवा । धर्म म्हणे जावें भीमा ॥१॥
गंगातिरासी येऊन । नमियेल ऋषिजन ॥२॥
त्वरा करा ऋषिजन । पात्रीं विस्तारलें अन्न ॥३॥
म्हणती बापा ऐसें नव्हे । पोट आहे किंवा काय ॥४॥
आतां स्वस्थ प्रसादें । तृप्त झालीं ऋषिवृंदें ॥५॥
कैंचा नष्ट दुर्योधन । आम्हां धाडिलें दुर्जनें ॥६॥
कष्टी करितां अंबऋषी । चक्र लागलें पाठीसी ॥७॥
तेचि गोष्टी झाली आतां । शीघ्र पळावें तत्त्वता ॥८॥
माझा आशिर्वाद धर्मा । नित्य कल्याणची तुम्हां ॥९॥
ऋषि निघाले तेथुनी । म्हणे नामयाची जनी ॥१०॥