(ओवी)
आधीं वंदितों गणपती । तैशी माता सरस्वती ।
मातापितागुरुप्रती । वंदन त्यांना सद्भावें ॥१॥
कवनीं लावावी मम मती । हीच पूजा शारदाप्रती ।
आवडीं घ्यावी मानून ती । दास विनवी सद्भावें ॥२॥
चरित्र आपुलें गावें । तव पदीं लीन व्हावें ।
दासास मुक्तीस न्यावें । आर्त पुरवीं एवढें ॥३॥