मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय १६

गणेश पुराण - अध्याय १६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

कथा नवलाची सांगती ब्रह्मदेव ।

श्रवण करिती तें व्यास पूर्ण भाव ।

काशिराजाही नित्य उषाकाळीं ।

उठे स्नानादी करित योग्य काळीं ॥१॥

भोजनासी विनवीत सदानंदा ।

वदत भूपाला जेविलों अमोदा ।

बहुत पक्वान्नें सिविलीं अतां मीं ।

देत ढेकर ती वासयुक्त नामी ॥२॥

क्षीरलड्‌वादी सेवुनी शेष खाद्य ।

काशिराजासी दाखवी जगद्वंद्य ।

असें पाहुनियां भूप वदे त्यास ।

कुणीं पूजियलें सांग करा आस ॥३॥

(भुजंगप्रयात्)

नृपासी वदे वृत्त तें काश्यपेय ।

असें दंडकारण्य तें शांत होय ।

तिथें नामलापूर तें एक आहे ।

भृशुंडी मुनी भक्त तेथेंच राहे ॥४॥

मला पूर्ण भावें भजे नित्य राया ।

म्हणूनी दिली मी तया माझि काया ।

निघे भूंवईपासुनी एक सोंड ।

भृशुंडी असे नाम देईच गोड ॥५॥

असे शुद्ध चौथी तिथी आज भूपा ।

म्हणूनी यजी भक्त मातें उमोपा ।

समर्पी मलाही बहू मिष्ट खाद्यें ।

विवाहार्थ त्याला शरणं प्रपद्ये ॥६॥

भृंशुडीस माझा कथीं हा निरोप ।

म्हणूनीच आलों वदे त्यास भूप ।

सुनैवेद्य जो तूं मला दाखवीला ।

मला योग्य वेळीं असे प्राप्त झाला ॥७॥

वदे भूप तेव्हां तया होय ऐसें ।

निघे एकटा तो रथीं बैसलासे ।

करीं घेतलीं शस्त्र अस्त्रेंचि त्यानें ।

त्वरें पातला तो तिथें शांततेनें ॥८॥

भृशुंडीस रायें नमीलें पदांला ।

तयासी कथी तो सुरानंद बोला ।

वदे कारणासी मुनीला नृपाल ।

वदे त्या नृपाला मुनी येच बोल ॥९॥

(गीति)

तो परमात्मा निर्गुण, आहे राजा प्रभू निराकार ।

तुझिया सदनीं आला, हें भाषण सत्य मिथ्य कीं इतर ॥१०॥

निर्णय करितां मजला, अशक्य आहे कथी तईं रुपा ।

काशीराज म्हणे त्या, अनंत रुपें म्हणून त्या रुपा ॥११॥

विधिशेष वर्णितां तें, झाले नाहीं समर्थ कीं साचे ।

सध्यां ते प्रभु जन्मति, कश्यपसदनीं मनूज रुपाचे ॥१२॥

त्याचें नांव महोत्कट, आहे वयही खरोखरी सात ।

बुद्धीमान असूनी, उत्तम अयुधें धरीत हस्तांत ॥१३॥

ऐसें असून त्याला, प्रार्थी कश्यप म्हणून मानव तो ।

बालक मदीय सदनीं, आहे मुनि भूप भाषणा श्रवि तो ॥१४॥

भूपा भृशुंडि वदला, शुंडा आली तया प्रभावानें ।

तो माझा देव असा, नाहीं वदतो खरोखरी मानें ॥१५॥

जरि तो परमात्मा कीं, रुप निराकार धरुन साकार ।

झाला असेल तरि त्या, सोडुन इतरां प्रभुस भजणार ॥१६॥

मुनिभाष्य ऐकुनी त्या, रायासी खेद जाहला भारी ।

राजा मुनीस वदला, ऐकुन वाणी श्रमी असा भारी ॥१७॥

जरि दर्शनास आलों, झालों मी वाटतेंच दुर्दैवी ।

विव्हळ त्यास बघूनी, भृशुंडि भूपा पुरांत त्या ठेवी ॥१८॥

मुनि त्यास नयन मिटण्या, सांगे तेव्हां मिटे नयन राजा ।

मुनिंनीं पाहुन शिरसीं, हस्ता ठेवून पोंचवी राजा ॥१९॥

घडलें वृत्त कथी तो, कश्यपपुत्रास तेधवां भूप ।

अपुला भक्त न आला, वाटे कौतुक तयास तें अमुप ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP