मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४०

क्रीडा खंड - अध्याय ४०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

केदार क्षेत्र असे, जमती तेथें मुनी तसे देव ।

गेले शरण विधीला, विधि सांगे त्यांस आपुला भाव ॥१॥

पूर्वीं त्या दैत्यानें, तप केलें पावले उमा-धव ते ।

त्यांनीं वर दिधले हे, राक्षस प्रबलें करुन कृत्यातें ॥२॥

भलत्या हातून त्याचा, नाश नसे हें विधी कथी त्यातें ।

वरदीं त्यांचें बल हें, आहे अत्यंत सांगतों मी तें ॥३॥

पार्वतिउदरीं तोची, जन्मे जर नाश तो करी त्याचा ।

विधि भाषणास परिसुन, स्तव करिती त्या भवानि मातेचा ॥४॥

नंतर गजाननासी, स्तविती झाले यथामती सारे ।

त्या समयीं देवांना, भीती सोडा तुम्ही अतां सारे ॥५॥

ऐसें अकाशवानी, द्वारें कळवी भवानि हें खास ।

दूरासदनाशाची, तजविज करित्यें असें वदे त्यास ॥६॥

हें वर्तमान सारें, देवांनीं कळविलें उमा-देवी ।

ऐकुन त्यांस म्हणे ती, असुर मरे बोलली उमा-देवी ॥७॥

क्रोधित झाली मग ती, श्वासोच्छ्‌वासीं अणिक नयनीं तें ।

अद्‌भुत तेज पडे त्या, तेजामध्यें दिसे सुरां जें तें ॥८॥

शुंडा-दंडे यांनीं, दंतांसह भूषणें तशीं वस्त्रें ।

यांनीं युक्त अशी ती, मूर्ती दिसली करांत तीं शस्त्रें ॥९॥

अवलोकुन मूर्तीला, देवांना मोद जाहला भारी ।

मूर्तीस नाम दिधलें, शुंडा-कृति वक्र-तुंड मन-हारी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP