मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४२

क्रीडा खंड - अध्याय ४२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

पाहून मल्ल-युद्धा, असुरा कळलें गणेशसामर्थ्य ।

दुसरे दिवशीं आला, दूरास होत सिद्ध युद्धार्थ ॥१॥

शस्त्रीं अस्त्रीं चाले, दोघांचें युद्ध त्या रणामाजी ।

शंभू स्मरुन वाणीं, दूरासद वन्हि अस्त्र हें योजी ॥२॥

त्यावर गणेशदेवें, योजियलें अस्त्र नाम पर्जन्य ।

गज-शुंडा इव वर्षे, रणरंगीं तो बहूत पर्जन्य ॥३॥

ऐसें परस्परांचें, शस्त्रास्त्रीं चालिलें महायुद्ध ।

दूरासदास लागे, भूक म्हणुन त्यजून हें युद्ध ॥४॥

जाई शिबिरामाजी, लढती योद्धे गजाननप्रभुसी ।

अर्धशताधिक रिपु ती, संख्या कीं निर्मिले गणेशासी ॥५॥

त्यांच्या हुंकारांनीं, पळती मरती असूर बहुसंख्या ।

कामीं आली तेव्हां, दूरासद आठवीत वर आख्या ॥६॥

शक्ती जनीत होई, तो मज हरवील हें तया स्मरलें ।

तो प्रभु तेथें प्रकटे, विराटरुपी शिखीं तयीं धरिलें ॥७॥

काशींत पाद ठेवी, शिरसीं दुसरा त्वरीत ठेवून ।

वदती प्रभू तयाला, शंकर वर दे नसे तुझें हनन ॥८॥

जाणत आहे दुष्टा, यास्तव होई गिरी पुरीवाशी ।

रक्षी पुरी अतां तूं, ऐकुन वदला असूर प्रभुपाशीं ॥९॥

जरि तूं माझ्या शिरसीं, पद ठेवुनियां इथेंच वसशील ।

तरि मी जाईन कोठें, वसणें आहे मदीय हें शील ॥१०॥

शंभूचा वर मजला, आहे ऐसा खरोखरी देवा ।

दूरासदभाषण हें, मान्य करी तो प्रभूहि सद्‌भावा ॥११॥

गिरिवरि आले तेथें, राक्षस शिरसीं पदास ठेवून ।

भक्तीचा भोक्ता तो, देव गजानन वसे तिथें अजुन ॥१२॥

क्रीडाखंडामधला, एकविसाचा समूह हा दुसरा ।

येथें समाप्त झाला, प्रभुकंठीं हा सुहार शमि दुसरा ॥१३॥

अनसूया वा साध्वी, नाम दुजें लक्षुमी असें सतिस ।

सतिधव अर्पी प्रभुला, कवनांचा हा करुन हारास ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP