मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ६३

क्रीडा खंड - अध्याय ६३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

भीषण दैत्य बरोबर, देवांतक घेउनी पुरीं आला ।

हें वर्तमान ऐकुन, काशीराजा भिऊन ये बिदिला ॥१॥

तेथें विनायकासी, भेटुन प्रार्थी बहूत विनयानें ।

यांतुन कीं रक्षावें, मागे चरणीं सुभाव प्रेमानें ॥२॥

विज्ञप्ती ऐकुनियां, देव विनायक करीत ती अयती ।

तत्काळ रुप लघू तें, त्यजिलें तेव्हां सुभव्य हो मूर्ती ॥३॥

हरि हें वहन जयाचें, सिद्धी बुद्धी विशाल ते बाण ।

हीं हीं संनिध आलीं, देवांतक सैन हें जणूंच टोळवण ॥४॥

ठरवी एकानें कीं, युद्धा जाणें करुं नये समरीं ।

सिद्धीला आज्ञा दे, साती सखियासहीत दळभारी ॥५॥

अरिसी आपण लढणें, गर्जे तेव्हां विनायक प्रभु तो ।

मारी हांक तयाला, इतुक्यामध्यें बघे रणीं सखि तो ॥६॥

अणिमा गरिमा महिमा, लघिमा प्राप्ती प्रकाम्य नी विषिता ।

अणखी इषिता ऐशा, आठहि सिद्धी असंख्यदल जनिता ॥७॥

युद्धारंभ भयंकर, झाला तेव्हां असूर बहु मरती ।

शुक्राचार्य तयाला, पुनरपि निर्मीत तेधवां लढती ॥८॥

यास्तव असूरसेना, झाली नाहीं रणांत कमजोर ।

ध्यानीं येतां प्रभुला, इषिता नामक सखी करी चतुर ॥९॥

रागानें कृत्या ती, निर्मुन रणिं त्या गुरुंस उचलाया ।

आज्ञा दिधलि सखीनें, उचलुन बरबरमधेंच टाकाया ॥१०॥

दुसर्‍या खंडामधला, समूह झाला इथें पुरा वदतों ।

झालों सजीव म्हणुनी, सद्‌भावें त्या प्रभूस कीं नमितों ॥११॥

अर्पी पुष्पें ताजीं, मांदाराचीं म्हणून हीं कवनें ।

ध्यावी विनायकानें, शुक्लासम मानुनी मला प्रभुनें ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP