|
पु. १ गुप्त कट ; खोल मसलत . ' असा काठ नजीबखान यानें केला . ' भाय ५८ . २ यत्न ; यक्ति ; चातुर्य . ; त्याचा तेथें कांहीं काट चालत नाहीं .' ३ ( व .) द्वेष ' तो पहिल्या पासून माझा काट करतो . ' ( सं . कूट ) न. मराण ( सं . कट = स्मशान ; फा . कटह = स्मशान ) कांटांत जाणें - मसणांत जाणें . २ ( ल .) ज्याची आपल्याला माहिती किंवा काळजी नाहीं त्याच्या हजर असण्याबद्दल अगर जाण्याबद्दल बेफिकीरवृत्तीनें बोलणें . जसें ;-' तो काटांत गेला ' = कुठें तरी , मसणांत गेला . पु. काप ; वार ; कापण्याची क्रिया . ( काढणें ) पु. १ ( कों .) कवळ , शिराटी इ० ( राबासाठीं ). २ ( विड्यांच्या पानाची ) लहानशी रास ; कुजकी पानें कापून शिल्लक राहिलेली कत्रण . ३ गंजिफा अगर पत्ते पिसुन झाल्यावर वाटण्याच्या आधीं वाटनार्याच्या डावे हातच्या माणसाकडुन जो भाग काढून ठेवतात ती क्रिया . ४ राज्याकारभार . घरखर्च वगैरेमधील काटछाट , काटकसर , कपात . ' लँकेशायरच्या गिरणीवाल्यांनी मजुरींत काट करण्याचें ठरविलें आहे .' - के १४ . ५ . ३० . ५ रेष ; फुली ; खोडणें . ६ - स्त्री . तोटा . ' या व्यवहारांत त्याला चांगलीच कट बसली .' ७ ( शिंपींधंदा ) कापलेला नमुना . ' विजारीचा काट पोंचला नाहीं .' ८ ( गो .) परावळी किंवा द्रोण यांना बांधावयाचा बंद . ९ आघात प्रहार . ' केला षड्वैर्यावर काट .' - दे कटिबंधसंग्रह ३ . ( सं . कृत = कापणें ; लिथु . केर्टु ; ग्री . केइरो ; स्लॉ . कोर्तु ; लॅ . कर्टस ; हिब्रु कतैघिम् ) पु. वरपगडा ; वरचष्मा . ' इंग्रजांच्या कवायती कंपूवर मराठे स्वारांचा काट चालेनासा झाला .' - भूभ्र २९ . ( काटणें ) पु. १ घट्ट राड ; राप ; गंज ; मळ , ' भीतरी जिव्हा तें चामखड । असत्य कांटे कांटली । ' - एभा ११ . ५९५ .' अनेक दोषांचें कांट । जे जे गादलें निर्धोट । होती हरिनामे चोखट । क्षण एक न लागतां । - तुगा २४९८ . २ ( महानुभाव ). कपड्यावरील वेलबुद्दीनें ( लाख , चीक वगैरेचें ) लुकण , खडीचा रंग ; कापडा . वरील डाग . ' कषायाचें काट । फेडुनि कीजे धुवट । ' - भाए २८३ . न. शाई बनविण्यासाठी नाचणी बाजरी , इत्यादी जाळुन त्यांत पाणी ओतुण केलेलें शिरें . कुळीथ हरभरा . इ० कडधान्याचें शिजवून काढलेले पाणी , कढण ; कट ; सुपार्या रंगीत पदार्थ किंवा कडधान्य शिजविलेलें पाणी ; आमसुलें तयार करण्यासाटाही त्यांना पुट देण्यासाठी केलेलें रातांब्यांचें पाणी ; ( गो .) मांस शिजवून तयार केलेलें पाणी . ( सं . क्वथ = कढविणें ) ०देणें मारणें ; खोडणें ; छाटणें , अपमान करणें .
|