|
पु. १ घाव ; वार ; फटका . २ ( क्रिकेट ) बोलरनें टाकलेला चेंडू अडविणें ( डाव्या बाजुस न मारतो ); दिशा बदलणें ( चेंडूची ). याचें फॉरवर्ड कट , स्केअर कट व लेट कट असे प्रकार आहेत . - व्यायाम १० . १९२२ .( इं ; तुल०सं . कृत ; प्रा . कट्ट = कापलेलें , छिन्न ) पु. काळा रंग ; कीट . ( सं . किट्ट ) पु. १ पुरण शिजवून आमटीसाठी त्यांतील जें पाणी काढतात तें . २ काढा ; कषाया ; घाणेरडें पाणी ( कपडे धुतल्यानें झालेलें ). ( का . कट्टु = डाळीचा , कडधान्याचा रस ) पु. १ जुट ; टोळी ; संघ ; ऐकमत्य . ' अलीकडे अशा प्रकारच्या हजारों जुटी किंवा कट युरोपांत होऊ लागलें आहेत .' - आगर ३ . ६७ . २ बंदुकीच्या दस्त्यास नळी घट्ट बसविण्यासाठीं असलेलें वेढें , कडी ; हत्तीच्या दातांना घातलेलें कडे ; ( सामा .) वेढें ; शेंबी .' बंदुकीला कट पट्य्ट्यास नक्षी .' - प्रला ४७ . ३ अंगावर किंवा कपड्यावर बसलेलें मळाचें पूट , लेप . ४ सोंगट्यांच्या पटांत * अशी खून केलेंली घर , ( ह्मा घरामध्यें सोंगटी बसली असतां ती मरत नाहीं , तिला कटावर बसली असें म्हणतात ). ' हिरवी मागें पिवळी लागे लाल बैसली कटीं । घरांत राहें पडुन काळी तिची खुंटली गति । ' - विक ८६ . ओकीबोकीच्या वगैरे खेळांत एक रंगाच्या चार सोंगट्या . ५ तंबुच्या किंवा कनातीच्या काठ्यांची टोकें बसविण्यासाठीं आणि तंबुचें दोर ज्या जागीं बांधतात ती जागा सुरक्षित राहण्यासाठीं तंबुच्या कानातील लाविलेली कातडी टोपी खोबण ; ( सामा .) चामड्याचा कांठ ; कड ; पदार्थाची कड खराब होऊं नये म्हणुन तिला घतलेला कातडीगोट . ६ गंडस्थल . प्रेसियलें भेदाया पतिधैर्यद्विरदकट कटाक्ष तिनें . ' - मोसभा ५ . १६ . ७ अमुक एक परिमाणाचा कडबा बांधण्याची दोरी ( साडेतीन हात लांबीची ). - खरे ८५० . ८ आग्रह - खरे ४४८६ . ९ ( अ .) सतारीचा पडदा . ( आ .) ज्यांतुन सतारीच्या तारा ओवून खुंटीस बांधतात त्या भोकें असलेल्या हस्तीदंती पट्ट्या . १० हिरडे व लोखंडाचा कीस यांचें मिश्रण . (?) ११ बिझिक खेळांतील ४ एक्के , ४ राजे , इ० जे मार्कोंचें संच ते . ( सं . कट = आवरण घालणें , आच्छादणें ; कट . तुल० का . कट्टु = बांधणे , रचणे , बंधन घालणें ) कटास हात लावणें - देवळाची पायरी अथवा उंबरठा याला हात लावून विश्वासु राहण्याबद्दल शपथ घेणें ; ( एखाद्या कार्याबद्द्ल अथवा गुप्त मंडळीबद्दल ), बेलभंडार उचलणें . न. गवत ; तृण ; कटाग्नि पहा . ( सं .) पु. १ ( कुण .) कड ; शेवट ; बाजूचा गोट . २ ( बा .) शेताचा बांध . ( कड . का . कट = शेवट ) पु. कष्ट ; त्रास ; दुःख ; यातना ; वेदना ( अव .) ( क्रि० खाणें . भोगणें ). ( कष्ट ) पु. कूट गाणें . ' कटावरी कट बंदावरी प्रबंद । ' - दावि १६३ . ( का . कट्ट = रचणें ( कविता , नाटक इ० ), कटाव ) पु. १ सैन्याचा एक गट , व्यूह , विशिष्ट रचना . २ गुप्त मसलत . व्यूह ; विभू . ' तुम्हाला त्या सर्वांनी वेगळें टाकण्याविषयीं कट केला आहे .' ' आमच्याविरुद्ध पुण्यांत कट झालेला आहे . कीं नाहीं बोल ? - इंप ३७ . ( का . कट्टे = रचना , बांधणी ) पु. मनाई ; थांबविण्याचा हुकूम . ' ते जाणोनियां एम्पेर दोरु । लोकासि कटु केला थोरु । म्हणे न करा युदेअनचा संसारू । ऐसा डांगोरा पिंटिला । ' - ख्रिपु २ . ४२ . १३७ . ( का . कट्टु = प्रतिबंध करणें ) स्त्री. कटि ; कंबर . ' सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनिया । ' - तुगा १ . ' विटेवरी पाय , कटेवरी हात । ' ( कटि , कट )
|