मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या २

संकेत कोश - संख्या २

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


दोन ( अठराहि पुराणांतर्गत सारवचनें ) - १ परोपकार हें पुण्य ब २ परपीडा हें पाप .

अष्ठादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ‌‍ ।

परोपकार : पुण्याय पापाय परपीडनम् ‌‍ ॥ ( सु . )

दोन अयनें - १ दक्षिणायन आणि २ उत्तरायण . दक्षिणायनांत सूर्याची गति दक्षिणेकडे असते . आरंभ कर्कसंक्रातीपासून होतो . उत्तरायणांत सूर्याची गति उत्तरेस असते . आरंभ मकरसंक्रांतीपासून होतो . ’ अग्रिज्योंतिरह : शुक्ल : षण्मासा उत्तरायणम् ‌‍ । ’ ( भ , गी . ८ - २४ )’ धुमो रात्रिस्तथा कृष्ण : षण्मासा : दक्षिणायनम् ‌‍ । ’ ( भ , गी . ८ - २५ )

दोन अंगें ( घर्माची ) - ( अ ) १ तत्त्वज्ञान आणि २ आचार . ( आ ) ( सार्वकालिक ) १ अभ्युदय आणि २ निश्रेयस .

दोन अंगें मुक्तीचीं - २ त्रिविध दु : खनिवृत्ति व २ परमानंद प्राप्ति . ( हरिपाठ रहस्य )

दोन अधिष्ठानें ( रोगाचीं ) १ शरीर आणि २ मन

.

दोन अधिष्ठानें ( लक्ष्मीचीं ) - १ चंद्र आणि २ कमल . ( संस्कृतीचीं प्रतीकें )

दोन अवस्था - ( अ ) १ सुख आणि २ दु : ख ; ( आ ) १ पृर्वावस्था ( वाल्य आणि तारूण्य ) आणि २ उत्तरावस्था ( प्रौढता आणि वार्धक्य ).

दोन अवस्था ( जीवाच्या ) - १ साधनावस्था आणि २ सिद्धावस्था . ( परमार्थ मार्ग )

दोन अवस्था ; जीवनाच्या - १ जीवन आणि २ मृत्यु .

दोन अवस्था विश्वाच्या - १ वज्र आणि २ मदन . ( कुमार संभव )

दोन अश्विनीकुमार - अश्चिनी नांवाच्या अप्सरेचे दोन जुळे मुलगे . हे देवांचे वैद्य होते .

दोन अक्षरी मंत्र - " राम "," शिव " हे प्रत्येकी दोन अक्षरांचे मंत्र काशीक्षेत्रांत तारक होतात .

दोन आदर्श भक्तश्रेष्ठ - १ हनुमान् ‌ आणि २ अर्जुन . यांनीं राष्ट्र - कार्यार्थ आपलें जीवित अर्पण केलें .

दोन आदिकारणभूत तत्त्वें सृष्टीचीं - १ शिव आणि २ शक्ति किंवा १ पुरुष आणि २ प्रकृति .

दोन आद्य शाहीर भारतांतले - १ कुश आणि २ लव . हे श्रीरामाचे पुत्र व वाल्मिकीचे शिष्यवर . हे रामायण गीत ऋषिसमुदाय , यज्ञमंडप , अथवा राजमार्ग यांवर बहुजनमनोद्दीपनार्थ कोठेंहि गाऊन दाखवीत असत . ( आर्या - रामायण वा . रा . ७ - ९३ - ५ )

दोन ईश्वरी देणग्या ( मानवाला ) - १ स्मृति , आणि २ विस्मृति . ( समग्र सावरकर वाडमय . )

दोन उपाय चित्त नाशाचे - १ योग आणि २ ज्ञान " द्वौ क्रमौ चित्तनाशस्य योगो ज्ञानं च राघव । ". ( योगवासिष्ठ )

दोन उपासना - १ सगुणोपासना आणि २ निर्गुणोपासना .

दोन कारणास्तव परान्नभोजन विहित आहे - १ परस्पर प्रेम असलें तर व २ उपासमार होत असेल तर . ( म . भा . उद्योग ९१ - २५ )

दोन कारणें कार्योत्पत्तीस आवश्यक ( अध्यात्म ) - १ निमित्त कारण आणि २ उपादान कारण . द्विकारणात्मकं सर्वकार्ये ।

( वेदान्तसार )

दोन गुण संस्कारांचे - १ गुणांची निर्मिति व २ दोषांचे निराकरण . ( तंत्रवार्तिक )

दोन गुप्त गंगा - १ गयेची फलगु व २ प्रयागची सरस्वती या दोन गुप्त गंगा होत .

दोन गोष्टी आजन्म संपादणेच्या - १ विद्या आणि २ धन . " अजरामरवत् ‌‍ प्राज्ञ : विद्यामर्थे च साधयेत् ‌ । ( म . भा . )

दोन गोष्टींत भीड धरूं नये - १ आहार , ( भोजन ) आणि २ व्यवहार . " आहारे व्यवहारे च त्यक्तलज : सुखीभवेत ‌‍ । " ( सु . )

दोन गोष्टींनी मानवाचा नाश होतो - १ चिता आणि २ चिंता .

दोन गोष्टी रोधतां येत नाहीं - ईप्सितार्थ मिळविण्याचा द्दढनिश्चय करणारें मन आणि २ उताराकडे वाहणारा जलप्रवाह . ( कुमार संभव )

दोन गोष्टींत संयम आवश्यक - १ जिव्हेंद्रिय आणि २ जननेंद्रिय . ( गुरुचरित्र कलिप्रभाव )

दोन चाकें संसाररथाचीं - १ स्त्री आणि २ पुरुष .

दोन गोष्टी स्वर्गसुखापेक्षां अधिक होत - १ जननी आणि २ जन्मभूमि .

नेयं स्वर्णपुरी लङ्रका रोचते मम लक्ष्मण ।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥ ( सु . )

दोन गोष्टी स्थिर ( चिरंतन राहणार्‍या ) - १ धर्म आणि २ कीर्ति .

अस्थिरं जीवितं लोके अस्थिरे धनयौवने ।

अस्थिरा : पुत्रदाराश्च धर्मकीर्तिद्वयं स्थिरम् ‌‍ ॥ ( सु . )

दोन गोष्टी परत जोडतां येत नाहींत - १ फुटलें मोतीं आणि २ तुटलें मन . ’ सोनें अथवा हस्तचरण । मोडिल्या सांधिती विचक्षण । फुटलें मोतीम तुटलें मन । सांधूं न शके विधाता । ’ ( मुक्तेश्वर म . भा . अ . १८ )

दोन गोष्टींत जन्माची सफलता - १ अनायासानें मरण व २ विना दैन्यानें जीवन . " अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ‌‍ । "

( स . )

दोन गोष्टींमुळें तीन आपत्ति ओढवतात - १ अपूज्यांची पूजा आणि २ पूज्यांची अवहेलना या दोन गोष्टी जेथें होतात तेथें १ दुर्भिक्ष , २ मरण आणि ३ भय या तीन आपत्ति ओढवतात .

अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानां तु विमानना ।

त्रीणि तत्र प्रवर्तन्ते दुर्मिक्षं मरणं भयम् ‌‍ ॥ ( सु . )

दोन गोष्टी क्षणभंगुर - १ तारुण्य आणि २ धन .

दोन ग्रहणें - १ चंद्रग्रहण आणि २ सूर्यग्रहण .

दोन चिकित्सा - १ मानसचिकित्सा आणि २ औषधी चिकित्सा .

दोन चैतन्यें - १ जीव चैतन्य आणि २ ब्रह्मचैतन्य .

दोन तत्त्वें अनादि - १ प्रकृति आणि २ पुरुष . " प्रकृतिं पुरुषं चैव विद्धयनादी उभावपि । " ( भ . गी . १३ - १९ )

दोन दोष ( चित्ताचे ) - १ रजोगुण व २ तमोगुण हे चित्ताचे दोन दोष . ’ रजस्तमश्च मनसो द्वौ दोषौ समुदीरितौ । ’ ( वाग्मट )

दोन द्रव्याचे अतिक्रम अथवा दुरुपयोग - १ कुपात्रीं दान करणें व २ सत्पात्रीं दान न करणें ; हे दोन संपादन केलेल्या द्वव्याचे अतिक्रम होत .

लब्धानामपि वित्तनां बोद्धव्यौ द्वावतिक्रमौ ।

अपात्रे प्रतिपत्तिश्च पात्रे चाप्रतिपादनम् ‌‍ ॥

( म . भा . शांति २७ - ३१ )

दोन देवर्षि - १ नारद व २ पर्वत .

दोन द्वारपाल ( श्रीविष्णूचे ) - १ जय आणि २ विजय .

दोन धर्म - ( अ ) १ विश्वधर्म व २ व्यवहारधर्म ; ( आ ) १ सामान्य धर्म आणि २ विशेष धर्म .

दोन धर्म मनाचे - १ वासना आणि २ विचार . ( नासदीय सूक्त भाष्य उत्तरार्ध )

दोन धर्मधुरंधर - १ भीष्म आणि २ श्रीकृष्ण .

दोन धनें - १ दैवधन ( उपासना आणि कर्म ) आणि २ मनुष्यधन ( भूमि , पशु आणि सुवर्ण ).

दोन धरुव - १ उत्तर ध्रुव , २ दक्षिण ध्रुव .

दोन नर - १ अर्जुन आणि २ अश्व .

दोन नृत्यें - १ ताण्डव ( शिव - नृत्य ) आणि २ लास्य ( पार्वती - नृत्य ) असे दोन प्रकार .

दोन पक्ष - १ शुक्ल पक्ष आणि २ कृष्ण पक्ष . पक्ष म्हणजे पंधरवडा . अमावास्येपासून पौर्णिमेपर्येत शुक्ल पक्ष व पौर्णिमेपासून अमावास्येपर्येतचा कृष्ण पक्ष .

दोन परम - सूक्ष्म तत्त्वें - १ चेतन आणि २ अचेतन ( बृहस्पति तत्त्व श्लोक ६ )

१ . दोन पापपुण्याचे साक्षीदार - १ माणसाचा आत्मा व २ परमेश्वर .

२ . पुराणकालीन पाकशास्त्र प्रवीण - १ राजा नळ - गोड पदार्थ ( स्वादिष्ट उंची पदार्थोची पाकनिष्पत्ति ) आणि २ भीम - तामस ( तिखट मिठाचे पदार्थ ) यावरून त्या त्या पाकप्रकारांना अनुक्रमें नळपाक आणि भीमपाक अशा संज्ञा मिळाल्या आहेत , ( म . शब्दकोश )

३ . दोन पुरुष - १ क्षर ( विनाशी ) आणि २ अक्षर ( अविनाशी ) या विश्रांत असे हे दोनच पुरुष आहेत . ( म . गी . १५ , १६ )

४ . दोन पुरुषोत्तम - १ मर्यादा पुरुषोत्तम - श्री रामचंद्र व २ पुराण पुरषोत्तम - श्रीकृष्ण .

५ . दोन पुराणकालीन वार्ताहर - १ नारद व २ संजय .

६ . दोन पुराणकालीन प्रतिज्ञा - १ कचप्रतिज्ञा आणि २ भीष्मप्रतिज्ञा .

७ . दोन प्रकारचे अलंकार - १ शब्दालंकार आणि २ अर्थालंकार .

८ . दोन प्रकारचे आचार - १ शास्त्रीय आचार आणि २ लौकिक आचार .

’ आचारो द्विविध : प्रोक्त : शास्त्रीयो लौकिकस्तथा ’

( देवी भाग . स्कंध ९ अ १ - १६ )

दोन प्रकार अवलोकनाचे - १ सिंहावलोकन - मागचें अनुसंधान ठेवून पुढें पाहणें व २ विहंगमाबलोकन - सूक्ष्म निरीक्षण .

दोन प्रकार ( कर्माचे ) - १ सकाम आणि २ निष्काम् ‌‍ .

दोन प्रकार ( सद्‌गुरुंचे ) - १ ध्यायी - शास्त्र आणि अनुभूति यांनीं युक्त आणि २ तत्त्वबित् ‌ - हा जन्मत : सिद्ध योगी असतो . ’ द्वैविघ्यं सद्‌गुरुणां च घ्यायितत्त्वविदाविति .’ ( योगसंहिता )

दोन प्रकार ( काव्याचे ) - १ नारिकेलरस - काव्य - कठीन व २ द्राक्षा - रस काव्य - सगम .

दोन प्रकारचा काल महा कठीण - मध्यान्ह काल २ अंतकाल .

दोन प्रकारची कुंडली - १ शापित आणि २ अनुगृहीत ( ज्योतिष )

दोन प्रकार गणिताचे - १ व्यक्त - अंकगणित व २ अव्यक्त - बीजगणित .

दोन प्रकार गुरूंचे - ( अ ) १ कारण गुरु आणि २ कार्यगुरु ( नित्या - नंद चरित्र ) ( आ ) दीक्षागुरु आणि २ शिक्षागुरु .

दोन प्रकार चोरांचे - १ उघड चोर व २ गुप्त म्हणजे वरून साव दिसणारा . ’ प्रकाशाश्चाप्रकाशाश्च द्विविधास्तस्करा : स्मृता :’ ( स्मृतिचंद्रिका )

दोन प्रकार ग्रंथपरीक्षणाचे - १ अंतरंग परीक्षण आणि २ बहिरंग परीक्षण .

दोन प्रकारचे जन्म - १ दिव्या आणि २ पार्थिव ( भ . गी . ४ - ९ )

दोन प्रकार ज्योतिषाचे - १ फ्लज्योतिष व २ गणित ज्योतिष .

दोन प्रकारचे छंद - १ वैदिक आणि २ लौकिक ( तत्त्व - निज - विवेक )

दोन प्रकारांनी र्धम साध्य आहे - १ द्वव्यरूपानें - यज्ञ वगैरेमुळें व २ देहानें - तीर्थयात्रा वगैरेमुळें . ’ धर्मश्व द्विविध : प्रोक्तो द्र्व्यदेहद्वयेन च ’ । शिव . पु . अ १३ )

दोन प्रकार ( धर्माचे ) - १ प्रवृत्तिपर आणि २ निवृत्तिपर . ( म . भा . शांति २४० - ६ )

दोन प्रकार ( घ्यानाचे ) - १ सगुनध्यान व निर्गुणध्यान .

दोन प्रकार ( नमस्काराचे ) - ( अ ) १ भावनमस्कार व २ द्वव्य - नमस्कार ; ( आ ) १ व्यवहारनमस्कार व निश्रयनमस्कार ( रत्न कंरडक )

दोन प्रकार प्रपंचाचे - १ विद्याप्रपंच आणि २ अविद्या प्रपंच . " प्रपंचो द्विविध : " ( बेदांत शास्त्र )

दोन प्रकार प्रयत्नाचे - १ शास्त्रीय व २ अशास्त्रीय " उच्छृंखलं शास्त्रियं चेति द्विविधं पौरुषं स्मृतम् ‌‍ " ( यो . वा . २ - ५ - ४ )

दोन प्रकारची बुद्धि - १ संशयात्मिका आणि २ निश्चयात्मिका .

दोन प्रकारचे ब्रह्यचारी - १ उपकुर्वाणक ( जो फिरून गृहस्थाश्रम स्वीकारतो असा ) आणि २ नैष्ठिक ब्रह्मचारी ( आजन्मपर्येतचा )

( दक्ष १ - २ )

दोन प्रकार भक्ताचे - १ सकाम भक्त आणि निष्काम भक्त .

दोन प्रकार भक्ताचे - १ ज्ञानपूर्व भक्ति व २ ज्ञानोत्तर भक्ति ( वामन पंडित ) ( आ ) १ गौणी भक्ति - ज्ञानपूर्व भक्ति अ २ पराभक्ति - ज्ञानोत्तर भक्ति . ( ज्ञानेश्वरी गूढार्थदीपिका खंद ३ )

दोन प्रकार भ्रमाचे - १ संवादीभ्रम - चांदी वाटून चांदी सांपडली तर आणि २ विसंवादीभ्रम - चांदी वाटून कथील सांपडलें तर ( सावित्रीचरित्र )

दोन प्रकार मनाचे ( अध्यात्म ) - १ शुद्ध - वासनांची भेसळ नसलेले आणि २ अशुद्ध ( ज्यांत काम व संकल्प असतात असें " मनो हि द्विबिधं प्रोक्तं शुद्ध चाशुद्धमेव च । अशुद्धं कामसंकल्पं शुद्धं कामविवर्जितम् ‌‍ ॥ " ( अमृत बिंदु उपनिषद् ‌‍ )

दोन प्रकार मौनाचे - १ आकारमौन ( उच्चार न करतां खुणेनें व्यक्त करणें ) आणि २ काष्ठमौन . ( उच्चारहि नाहीं व खुणोनेंहि नाहीं असे . ) ( अमृतानुभव - ठीका )

दोन प्रकार मंत्रांचे - १ स्वयंभूमन्त्र आणि २ वरदमन्त्र - ( वैदिक - सं . पुनर्घटना )

दोन प्रकारचे योगी - १ गुप्तयोगी व २ व्यक्तयोगी ( श्रीरामकृष्ण वाक्सुधा )

दोन प्रकारचें विज्ञान - १ आलय विज्ञान - अहं असेम जें ज्ञान होतें त्यास म्हणतात अ प्रवृत्ति विज्ञान - इंद्रियांनीं होणारें ( बौद्धदर्शन )

दोन प्रकारचा विनय - १ स्वाभाविक आणि २ कृत्रिम , " द्विविधो विनय : स्वाभाविक : कृत्रिमश्च " ( कौटिल्य )

दोन प्रकारचे शौच - १ बाह्म शौच आणि २ आभ्यंतर शौच . हें दोन प्रकारचें शौच अथवा पावित्र्य . " शौचं तु द्विविधं प्रोंक्तं बाह्ममाभ्यन्तरं तथा " ( शिवतत्त्वरत्नाकर ६ - ९ ), ( द्क्षस्मृति )

दोन प्रकार श्रद्धेचे - १ प्रयोजिका व २ निश्चयात्मिका ,

दोन प्रकार ज्ञानाचे - ( अ ) १ अनुभव व २ स्मृति - पुन : प्रत्यय . न्यायदर्शन ) ( आ ) १ लौकिकज्ञान आणि व २ परमात्मज्ञान

( सुफीसंप्रदाय ) ( इ ) १ शब्दज्ञान आणि २ अनुभवसिद्ध ज्ञान ( देवी . भा . ) ( ई ) यथार्थ ज्ञान आणि २ अयथार्थज्ञान ( रर्क . )

दोन प्रज्ञा - १ स्थितप्रज्ञा व २ अस्थितप्रज्ञा .

दोन प्रवृत्ति - १ सत्प्रवृत्ति आणि २ असत्प्रवृत्ति . जगांत या दोन्ही सनातन आहेत .

दोन प्राणी भयंकर सदाची - १ हंसणारा पुरुष आणि २ रडणारी स्त्री .

दोन प्रकारचे योग - १ साध्ययोग आणि २ साधनयोग ( आ ) संप्रज्ञातयोग आणि २ असंप्रज्ञातयोग . ( योगशास्त्र )

दोन प्रकारचीं रूपें परमात्म्याचीं - १ विश्वात्मक आणि २ विश्वो - त्तीर्ण - निर्विकार स्थिति ( श्रिशैवागम आणि ज्ञानेश्वर )

दोन प्रकार वेताळाचे - १ रुद्रवेताळ आणि २ अग्निवेताळ -( आग्या - वेताळ ) - एक ग्राम दैवत . ( गाजलेलीं दैवतें )

दोन प्रकार वैराग्याचे - १ ज्ञानवैराग्य आणि २ निर्वेदवैराग्य . अनुभवामृत - अमृतवाहिनिटीका

दोन प्रकारच्या व्याधी - १ दोषजन्यव्याधि आणि २ कर्मजन्य व्याधि - पूर्वकर्मानें प्राप्त झालेल्या .

दोन प्रकारची शरीरें - १ पार्थिव शरीर आणि २ मानस शरीर ( रघु २ - ५७ )

दोन प्रकारचे संत - १ कुटुंबसंत आणि २ समाजसंत ( संतसाहित्य )

दोन प्रकारची संतति प्रजापतीची - १ देव आणि २ असुर . देव हे लहान आणि असुर हे ज्येष्ठ ’ दूया ह प्राजापत्या देवाश्चासुराश्च । ’ बृहदारण्यक १ - ३ - १ )

दोन प्रकारचा संन्यास - १ विविदिषा संन्यास व २ विद्धत् ‌‍ संन्यास .

दोन प्रकार समाधीचे - १ संप्रज्ञात अथवा सविकल्प समाधि आणि २ असंप्रज्ञात अथवा निर्विकल्प समाधि .

दोन प्रकार सिद्धींचे .... १ कल्पिता ब २ अकल्पिता . ( योग शिखोप - निषत ‌‍ )

दोन प्रकार शास्त्रचें - १ भौतिक आणि २ अभौतिक - मानसशास्त्र , अर्थशास्त्र इ .

दोन प्रकार संकेतांचे - १ श्रद्धाप्रधान ( शास्त्राधारावरून ठरविलेले ) आणि २ कल्पनाप्रधान . ( कविप्रतिभाजनित ).

दोन प्रकार संस्काराचे - ( अ ) १ श्रौत आणि २ स्मार्त ( आ ) ब्राह्म गर्भादान इ . व २ दैवी - पाकयज्ञ इ . " द्विविधो हि संस्कारो ब्राह्मो दैवश्च " ( हारीत )

दोन प्रकारची सृष्टि - १ दैवी आणि २ आसुरी . " द्वौ भूतसगौं लोकेऽस्मिन् ‌‍ दैव आसुर एव च " ( भ , गी . १६ - ६ )

दोन प्रकार दास्याचे - १ कृपादास्य आणि २ मायादास्य . ( गूढार्थ - चंद्रिका ) ( आ ) १ दैवीदास्य व २ विदूषकीदास्य ( नारदीय सूक्त भाष्य )

दोन प्रकारचे ज्ञान - ( अ ) १ जन्मसिद्ध आणि २ अनुभवसिद्ध ; ( आ ) १ शाव्दिक ज्ञान आणि २ अनुभवजन्य ज्ञान .

ज्ञांनं तु द्विविधं प्रोक्तं शाब्दिकं प्रथमं स्मृतम् ‌‍ ।

अनुभवाख्यं द्वितीयं तु ज्ञानं तद्‌‍दुर्लमं नृप ॥

( देवी भाग , षष्ठ स्कंध १५ - ५२ )

दोन प्रकारच्या माणसांना सुखाचा लाभ होतो - १ आगामी संकटाची आगाऊ तरतूद करणारा आणि २ प्रसंगीं ज्याला युक्ति सुचते तो .

अनागतविधाता च प्रत्युपन्नमतिश्च य : ।

द्वावेव सुखमेघेते दीर्घसूत्री विनश्यति ॥

( म . भा . शांति १३७ - १ )

दोन प्रकारचे पुरुष जगांत विरळा - १ ज्यानें जें मागितलें त्यास तेंच देऊन टाकणारा आणि २ आपण स्वत : कोणापासून कांहींहि न मागणारा ( कल्याण - उपनिषत् ‌‍ अंक ).

दोन प्रकारचें वैर - १ स्वाभाविक आणि २ कृत्रिम . साप आणि मुंगूस , पाणी व अग्नि , देव आणि दानव , कुत्रा व मांजर , सिंह आणि हत्ती , सज्जन व दुर्जन हीं स्वाभाविक वैराचीं उदाहरणें ( पंचतंत्र )

दोन प्रतिज्ञा ( अर्जुनाच्या ) - १ दैन्य न भाकणें ब २ युद्धांत पाठ न दाखविणें . ’ अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वै न दिन्यं न पलायनम् ‌‍ ’ ( सु . )

दोन प्रयत्न ( व्याकरणशास्त्र ) - १ आभ्यंतर प्रयत्न आणि २ बाह्म प्रयत्न . आभ्यंतर प्रयत्न - वर्णोच्चाराचे वेळी उच्चारस्थानाचे आंतील प्रयत्न ( हा पांच प्रकारचा आहे ) आणि बाह्म प्रयत्न - वर्णोच्चाराचे वेळीं जिव्हा तालु इत्यादि इंद्रियांच्या साह्यानें होणार ( हा अकरा प्रकारचा आहे ) ’ तुल्यास्यप्रयत्नं सवर्णम् ‌‍ ’ ( सि . कौ . १ - १ - ९ )

दोन प्रलय - १ नित्यप्रलय आणि २ महाप्रलय

दोन ब्रह्में - ( १ ) शब्दव्रह्म आणि २ परब्रह . ( आ ) १ शब्दब्रह्म आणि २ अशब्दब्रह . घ्यान करण्याला योग्य अशीं दोन ब्रह्में " द्वे ब्रह्माणी वेदितव्ये " मैत्रायणीयापनिषद् ‌‍

दोन भक्तिसाधनें - १ नामस्मरण आणि २ कीर्तन .

दोन भाग्यवान माता - ( अर्वाचीन कालीन ) १ आंध्रराजा शातकर्णी याची मातोश्री गौतमीदेवी ( १५ वे शतक ) व २ छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री जिजाबाई ( १७ वे शतक ) ( पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज )

दोन भाव मनाचे - १ संकल्प आणि २ विकल्प . ( मणिकांचन )

दोन महामूर्ख - १ जुनें तेवढें चांगलें व नवीन सर्व त्याज्य म्हणून जुनें कवटाळणारा आणि २ जुनें सर्व वाईट व नवीन तेवढें चांगलें म्हणणारा ( वर्नार्ड शाँ )

दोन मति - १ सुमति व २ कुमति .

दोन मनें - १ अंतर्मन व २ बहिर्मन . ’ चित्तंहि द्विविधम् ‌‍ ’ ( योगशास्त्र ) ( आ ) १ जागृतींतील मन आणि २ मुषुप्तींतील मन " द्विविघं हि मन : "

दोन मार्गदर्शक ऋषि - ( मानष शरिरांतले ) १ बोध - ज्ञान आणि २ प्रतिबोध - विज्ञान " बोधप्रतिबोधौ ऋषी " ( अथर्ववेद कांड ५ )

दोन मंत्री व गुप्तचर रावणाचे - १ शुक्त आणि २ सारण . ( वा . रा . युद्ध - सर्ग २५ - १४ )

दोन मार्ग - १ अर्चिरादि मार्ग - प्रकाशाचा व २ धूमादिमार्ग - अंधाराचा मार्ग ( वेदांत )

दोन मार्ग ( जगांत आयु : क्रमणाचे ) - १ सांख्य ( संन्यास मार्ग ) आणि २ योग ( कर्ममार्ग ) ( गी . र . ६२५ )

दोन मार्ग धर्मसाधनेचे - १ प्रवृत्तिमार्ग आणि २ निवृत्तिमार्ग . ’ प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च द्विविधं धर्मसाधनम् ‌‍ ’ ( मोक्ष गीता ३ - ४ )

दोन मार्ग साधकाला मुक्ति देणारे - १ विहंगममार्ग आणि २ पिपीलिका मार्ग . यांचे प्रवर्तक अनुक्तमें शुक व वामदेव होत .

शुकश्चा वामदेवश्च द्वे सृती देवनिर्मिते ।

शुको विहड्‌‍गम : प्रोक्तो वामदेव : पिपीलिका ॥

( बराहोपनिषद् ‌‍ अ ४ )

दोन मीमांसा - १ पूर्व मीमांसा ( कर्मकांड ) आणि २ उत्तर - मीमांसा - वेदांतशास्त्र ( ज्ञानकांड ).

दोन मूलभूत तत्त्वें भारतीय तत्त्वज्ञानाचीं - १ मी - विचार करणारा व २ तूं - विचार्य वस्तु . ( ब्रह्मसूत्र भाष्य प्रस्तावना )

दोन मंगलदायक शब्द - १ ॐ आणि २ अथ . हे दोन्ही शब्द ब्रह्मदेवाच्या कंठांतून प्रथम बाहेर आले म्हणून मंगलदायक गणले आहेत .

ॐ कारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण : पुरा ।

कंठं भित्त्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकाबुभौ ॥ ( स्मृति )

दोन राष्ट्रीय गीतें ( भारतीय ) - १ वंदेमातरम् ‌‍ - - बंकिमचंद्र आणि २ जन गण मन ( टागोर )

दोन लक्षणें दोघांची ( मित्र - शत्रू ) - १ उपकार - मित्रलक्षण व २ अपकार हें शत्रूचे लक्षण . " उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् ‌‍ "

( वा . रा . किष्किंधा ८ - २१ )

दोन राष्ट्रीय महाकवि - १ व्यास आणि २ वाल्मीकि .

दोन रूपें ब्रह्माचीं - १ साकार आणि २ निराकार " द्वे बाब ब्रह्मणो रूपे मूर्ते चैवामूर्ते च " ( वेदांतशास्त्र )

दोन लक्षणें ( पदार्थाचीं ) - १ तटस्थ लक्षण - पोषाख वगैरे म्हणजे बदलणारें आणि २ स्वरूप लक्षण - विद्या शील वगैरे - टिकणारें

( वेदान्त )

दोनवाद ( अनादि ) - १ भोगवाद आणि २ त्यागवाद ( पुरुषार्थ - बोधिनी भ . गी . ) ( आ ) १ प्रतिबिंबवाद व २ अवच्छेद वाद ( विचार चंद्रोदय ) ( इ ) १ सृष्टि - द्दष्टिवाद - सृष्टीवर ज्ञान अवलंबून आहे आणि २ द्दष्टि - सृष्टिबाद - द्दष्टीवरच सुष्टि अवलंबून आहे .

दोन विचारधारांचे प्रतीक असे दोन भारतीय खेळ - १ सोंगटया - दैववाद आणि २ बुद्धिवळें - प्रयत्नवाद ( याकूबी संस्कृति कोश )

वादाचीं दोन प्रबल कारणें - १ कनक आणि ६ कांता . हीं कोणताहि विग्रह उत्पन्न होण्याचीं दोन मूल कारणें . ’ कामिनी कनकं कार्ये कारणं विग्रहस्य वै ’ ( देवी भाग . चतुर्थ स्कंध १० - ६ )

दोन विद्या - ( अ ) १ पराविद्या - आत्मविद्या - ब्रह्मविद्या आणि २ अपराविद्या - ऋग्वेद . यजुर्वेद . सामवेद , अथर्ववेद आणि १ शिक्षा २ कल्प , ३ व्याकरण ४ निरुक्त , ५ छंद , व ६ ज्योतिष ही सहा वेदांगें . " द्वे विद्ये वेदितव्ये " ( मुण्डक १ - १ . ४ ) ( आ ) १ शस्त्रविद्या व २ शास्त्रविद्या , " विद्या शस्त्रस्य - शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये " ( हितो . ) ( इ ) १ बला आणि २ अतिबला . सर्व प्रकारच्या ज्ञानांचें उगमस्थान . अशा या देवनिर्मित दोन विद्या - बला आणि अतिबला विश्वामित्रानें श्रीरामास दिल्या . ( वा . रा , बाल . सर्ग २२ - १७ )

दोन वैरी यथार्थ ज्ञानाचे - १ निंदा व २ स्तुति .

दोन वंश - १ जन्मवंश आणि २ विद्यावंश .

दोन शब्दांत दोन संस्कृति - १ श्रुतिस्मृतिपुराणोक्त - पौरस्त्य आणि २ अद्ययावत् ‌‍ - - पाश्चात्य ( सावरकर )

दोन विशेष ( लाभ ) संस्कारांचे - १ गुणांची निर्मिति व २ दोषोंचें निराकरण ( तंत्रवार्तिक )

दोन शक्ति मायेच्या - १ आवरण - अधिष्ठानास झांकणारी आणि २ विक्षेप - विपरीत भासविणारी ( हरिवरदा १८ - ४ )

दोन शरीरें ( रूपें ) रुद्रदेवतेचीं - १ घोर शरीर आणि २ शिवशरीर ( रुद्रार्थदीपिका )

दोन शाश्वत नेत्र ( मानवाचे ) - १ श्रुति - मंत्रात्मकवेद आणि २ स्मृति - वेदानुकूल - साहित्य . " श्रुतिस्मृती उमे नेत्रे ’ ( सु )

दोन संपत्ति - १ दैवी संपत्ति आणि २ आसुरी संपत्ति .

दोन साधनें दैवाला अनुकूल करून घेण्याचीं - १ प्रयत्न आणि २ प्रार्थना ( विचार पोथी )

दोन साधनें ज्ञानाचीं - १ शास्त्राभ्यास व २ गुरुपदेश .

दोन खरे परदेशी - १ जीवन आणि २ झाडाचें पान ( राजस्थानीं लोककथा )

दोनच खरे यात्रेकरू - १ सूर्य आणि २ चंद्र ( भोज - लोककथा )

दोन्च खरे राजे - १ इंद्र आणि २ यम ( भोज - लोककथा )

दोघेजण अंगीकारलेलें काम पूर्णतेस नेण्यास बद्धपरिकर होत -

१ राजा ( राज्यशासनकर्ते ) आणि २ बहुश्रुत ब्राह्मण . ’ द्वौ लोके घृतब्रतौ राजा च ब्राह्मणश्च बहुश्रुत : ’ ( गौतम धर्मसूत्रें ८ - १ )

दोघेजण दुर्मिळ - १ अप्रिय पण हितकर असें सांगणारा व २ तें ऐकून घेणारा . ’ अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता दुर्लभ : ’ ( वा . रा . अरण्य ३७ - २ )

दोघेजण जलसमाधि देण्यास योग्य - ( अ ) १ धनिक असून दान न देणारा आणि २ दरिद्रि असून तपस्या ( कष्ट ) न करणारा . द्वावम्भसि निवेष्टव्यौ गले बध्वा द्दढां शिलाम् ‌‍ ।

धनवन्तमदातारं दरिद्रं चातपस्विनम् ‌‍ ॥

( म . भा . उद्योग ३३ - ६० )

दोघेजण जगमित्र - १ निंदक - पाप हरण करणारा व २ अतिथि - सद्रति मिळवून देणारा .

अतिथिश्चापवादी च द्वावेतौ विश्वबन्वव : ।

अपवादी हरेत्पापमतिथि : स्वर्गसंक्रम : ॥

( मार्कडेय पु . )

दोघेजण पराजित होत - ( अ ) १ कर्ज घेणारा आणि २ मुलीचा बापा . ( भोज - लोककथा ) ( आ ) १ लोभी गुरु आणि २ लालची चेला

( कबीर )

दोघेजण विपरीत कर्मामुळें फजित होतात - १ गृहस्थाश्रमी असून कर्तव्यपराड्‌‍मुख आणि २ भिक्षुक असून खटपटी .

अनारम्मो गृहस्थश्च कायवांश्रैव मिक्षुक : ।

उमौ तौ न विराजेते विपरीतेन वर्त्मना ॥

( रामगीता ९ - ७ )

दोघेजण सूर्यमंडलाचा भेद करून जाणारे - १ समाधींत देह - त्याग करणारा योगी आणि २ घारातीर्थी मरण आलेला .

( म . भा . उद्योग ३३ - ६१ )

द्विजिव्ह - १ सर्प आणि २ चहाडखोर .

द्वितत्त्ववाद - दोन परस्पर विरोघी तत्वांपासून जगांतील सर्व गोष्टींचा खुलासा करतां येतो असें प्रतिपादणारें मत .

द्विविधनिष्ठा - १ सांख्ययोग आणि २ कर्मयोग . या दोन निष्ठा म्हणजे अनुष्ठानतत्परतेचे मार्ग . ( म . गी . ३ - ३ )

द्विविध विश्व - १ जड - २ चेतन . १ पुरुष - २ प्रकृति , १ साकार - २ निराकार , १ स्थूल - २ सूक्ष्म , १ अचेतन - २ सचेतन . असें हें एकंदर विश्व द्विविध आहे .

द्वैत - ( पंचमेदवाद ) १ ब्रह्म व जीव २ जीव व जगत् ‌‍ ३ ब्रह्म व जगत् ‌‍ ४ जगांतील पदार्थ व ५ जीवाजीवांत मेद मानणारें मत .

द्वंद्व - जोडी - युग्म . दोन परस्पर विरुद्ध गोष्टी साहचर्यानें राहतात . अशीं अनेक द्वंदें या जगांत आहेत . उदा . - जड - चेतन , पुरुष - प्रकृति , देव - दैत्य , प्रपंच - पर्मार्थ , प्रकाश - अंधकार , राग - लोम . सुख - दु : ख शीत - उष्ण . धर्म - अधर्म . पुण्य - पाप . ज्ञान - अज्ञान , उत्पत्ति - लय , लाभ्म - हानि , जय - पराजय , निंदा - स्तुति , मान - अपमान , शत्रु - मित्र , सज्जन - दुर्जन , सत् ‌ - असत् ‌‍, आशा - निराशा , शाप - आशीवीद , प्रवृत्ति - निवृत्ति , त्याग - भोग . हिंसा - अहिंसा , दिवस - रात्र , प्रेम - द्वेष , हर्ष - शोक , नीति - अनीति , शुभ - अशुभ , सम - विषम , सगुण - निर्गुण , विधि - निषेध , नित्य - अनित्य , व्यष्टि - समष्टि , द्वैत - अद्वैत , विवेक - वैराग्य , जन्म - मरण , बंध - मोक्ष , आवड - नावड , उत्कांति - अपकांति , शिव - अशिब , मंगल - अमंगल , शरीर - आत्मा , जुनें - नवें , सनातनी - क्रांतिकारी , मृत्यु - जीवन , सापेक्ष - निरपेक्ष , स्त्री - पुरुष इ .

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP