औट - म्हणजे साडेतीन .
साडेतीन पीठें - १ तुळजापूरची भवानी , २ मातापुरची रेणुका , ३ जोगाईच्या आंब्याची योगेश्वरी आणि १ - २ कोल्हापूरची लक्ष्मी हीं देवीचीं साडेतीन पीठें मानिलीं आहेत .
साडेतीन् मुहूर्त - १ वर्षप्रतिपदा , २ अक्षय्यतृतीया , ३ विजया - दशमी हे तीन पूर्ण व बलिप्रतिपदा हा अर्धा .
साडेतीन वाद्यें - १ वीणा , २ पखवाज , ३ बांसरी आणि १ - २ मंजिरी मिळून साडेतीन वाद्यें .
साडेतीन शहाणे ( पेशवाईंतील )- १ सखारामबापू बोकील , २ देवाजीपंत चोरघडे , ३ विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस अर्धा शहाण . हे साडेतीन शहाणे मराठयांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत .