शब्द - संकेत
( " अनंतपारं किल शब्दशास्त्रम् " याप्रमाणें संख्यात्मक व संख्येव्यतिरिक्त संकेतांचीहि व्याप्ति अमाप आहे . जिज्ञासू वाचकांस ज्ञान व मनोरंजनाबरोबरच आकर्षकपणा वाटून जिज्ञासा वृद्धिंगत व्हावी एकढयापुरतेंच कांहीं संकेतांचें मर्यादित संकलन )
श्री - पीठस्थ आचार्यास उद्देशून संकेतानें वापरतात . उदा० श्रीशंकराचार्य , श्रीमध्वाचार्य इ . श्री शब्द सामान्यतः श्रेष्ठत्व बोधक आहे . सामान्य यतीला श्री १०८ व पीठस्थ आचार्यांस श्री १००८ असें संबोधिलें जातें .
अर्धोदय पर्व - पौष व ॥ अमावास्येचा प्रथम भोग रविवारा व श्रवण नक्षत्राचा मध्यभाग व व्यतिपाताचा अत्यंभाग हे यो असले म्हणजे अर्धोदयपर्व होय . याचें पुण्य कोटि सूर्यग्रहणासमान आहे . ( धर्मसिंधु )
अधिक मास - सूर्यसंक्रातिरहित चांद्रमास , चांद्रवर्षांत सुमारें तीन चर्षांनीं येणारा तेरावा महिना ,. हा महिना साधारणत ; ३२ महिने १६ दिवस आणि ४ घटिका इतक्या कालावधीनंतर येतो . यासच धोंडा महिना , मल मास किंवा पुरुषोत्तम मास अशीं नांवें आहेत .
अमृतसिद्धि योग - रविवारीं हस्त , सोमवारीं श्रवण किंवा मृग , मंगळवारीं अश्विनी , बुधवारीं अनुराधा , गुरुवारीं पुष्य , शुक्रवारीं रेवती व शनिवारीं रोहिणी . याप्रमाणें वार व नक्षत्रयोग हा कोणत्याहि कार्याअस शुभ मानलेला आहे . त्यासच अमृतसिद्धि योग म्हणतात .
अश्वत्थामा दुग्ध - पाण्यांत पीठ कालवून केलेला दुधासारखा पातळ पदार्थ , असा द्रोणाचार्यांच्या पत्नीनें आपल्या मुलाला - अश्वत्थामाला करून दिला होता अशी कथा आहे . असाच लहान मुलांच्या हट्टाच्या समजुतीचा एक प्रकार लक्षणेनें समजावयाचा .
अप्रशिखा - एकाचा मित्र त्यास ठार करावयास प्रवृत्त झाला असतां आपलें मुत्युवृत्त इतरांस कळावें म्हणून त्यानें अ - प्र - शि - ख या अद्याक्षरांत रचलेली चार चरणांची कविता . अनेन तव पुत्रेण । प्रसुप्तस्य वनांतरे । शिखामादाय हस्तेन । खड्गेनोपहतं शिरः ॥
यावरून सांकेतिक भाषा . ( म . श . कोश . )
अहल्याबाई - होळकर घराण्यांत ऐतिहासिक कालांत होऊन गेलेली दानशूर स्त्री . यावरून संकेतानें अहल्याबाई म्हणजे दानशूर स्त्री .
आखाड सासरा - नसता मोठेपणा आपणाकडे घेऊन दुसर्यावर करडा अंमल चालविणार्या मनुष्यास म्हणतात .
कपिला षष्ठी - भाद्रपद वद्य षष्ठीच्या दिवशीं मंगळवार , रोहिणी नक्षत्र , व्यतिपातयोग , सूर्य नक्षत्र हस्त , इतके योग आल्यास तीस कपिला षष्ठी म्हणतात . हा अपूर्व योग बहुधा साठ वर्षांनीं येतो . ज्या गोष्टी एकत्र जमणें अशाक्य त्या आकस्मिकपणें एकत्र जमल्यास आनंदानें कपिला षष्ठीचा योग म्हणतात .
कन्यागत - कन्या राशीस गुरु येतो तो काल हा फरा शुभ समजतात . हा काल सिंहस्थानंतर येतो . तो सुमारें तेरा महिने असतो या काळांत भागीरथी नदी कृष्णेस भेटावयास येते अशी समजूत आहे . म्हणून कन्यागतांत कृष्णास्त्रानास विशेष महत्त्व मानलें आहे .
कोजागिरी - आश्विन शु ॥ १५ . या दिवशीं रात्रीं लक्ष्मीप्रीत्यर्थ मध्यरात्रीपर्यंत जागून लक्ष्मी व चंद्र यांची पूजा करून दूध वगैरे पितात . कोजार्ति म्हणजे कोण जागतो असें लक्ष्मी विचारते व जो जागा असतो त्याला संपत्ति देते अशी समजूत आहे .
कुंभकर्णी झोंप - रावणाचा भाऊ कुंभकर्ण अत्यंत झोंपाळू होता यावरून , लक्षणीनें . हा निद्रेंतून सहा महिन्यांनीं एकदां जागा होत असे अशी कथा आहे .
गर्गाचार्या मुहूर्त - सूर्योदयाचा पूर्वीच्या ५ व्या घटकेपासून तिसर्या घटकेपर्यंतचा काल अथवा सूर्योदयापर्यंतची वेळ हा शूभ मुहूर्त असून गमनास योग्य मानतात . गर्गमुनि हे थोर ज्योतिषशास्त्रवेत्ते होऊन गेले . यांनी भगवान् श्रीकृष्णाचें जातक वर्तकिलें होतें . त्यांनीं रचिलेले वृद्धगर्गसंहिता - गर्गसंहिता - हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत .
गद्धेपंचविशी - ज्यांत विवेक अथवा पोंच फारसा नसतो असा . मनुष्याच्या सुमारे पंचवीस वर्षेपर्यंतच्या कालाला संकेतानें म्हणतात .
गणेश टोपी - मागून हळूच येऊन एकाद्याच्या तोंडावर वस्त्र टाकून आवळणें वा डोळे झांकल्यामुळें त्याला दिसेनासें झालें म्हणजे यथेच्छ बुकलणें अशाप्रकारचा एक खेळ .
गोरज मुहूर्त - गुरें ( गाई वांसरें ) रानांतून घरी परत येत असतां त्यांच्या चालण्यानें उडालेली धूळ दिसते तेव्हांचा काल .
गौरीचे डोहाळे - चैत्रांत पडणारी पावसाची बुरबुर याला संकेतांनें म्हणतात .
घटोत्कचाचा बाजार - भीमपुत्र घटोत्कच हा सर्व राक्षसी ( मायावी ) विद्येंत प्रवीण व कामरूपघर होता . एकदम नाहींसें होणें ; वाटेल तें रूप घेणें वगैरे . यांवरून मायावी बाजार अथवा फसवेगिरी असा अर्थ रूढ झाला
घबाड शुहूर्त - सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजून येणार्या संख्येला तीन या संख्येनें गुणून गुणाकारांत चालू तिथी मिळवून आलेल्या संख्येला सातांनीं भागून बाकी तीन उरल्यास त्या दिवशीं हा योग येतो असें समजतात व तो शुभ मानला जातो .
घागरगडची सुभेदारी - घागरीनें पाणी वाहण्याचें काम करणारा या अर्थी .
दशंहरा - ज्येष्ठ शुद्ध दशमीला गंगेचा अवतार झाला . या दशमीला दशहरा असें नांव आहे . त्या दिवशीं जे दहा योग सांगितले आहेत तेः - १ ज्येष्ठमास , २ शुक्लपक्ष , ३ दशमी , ४ बुधवार , ५ हस्तनक्षत्र , ६ व्यति - पात , ७ गरा ( या नांवाचे करण आहे ), ८ आनंद योग , कन्या राशीचा चंद्र आणि १० वृषम राशीचा रवि . ( धर्मसिंधु )
नित्य प्रलय - झोंप . गाढ झोपेला वैदिक नित्य प्रलय म्हणतात . नित्य प्रलयांत जीवनाची आहुति टाकून पुन्हा जागें होऊन नव्यानें जन्माला यावयाचें म्हणून .
बादरायण संबंध - ओढून ताणून लावलेला संबंध . कथा कथा अशी आहे कीं एक लुच्चा मनुष्य एकाकडे जाऊन मी तुमचा संबंधी आहे असें सांगू लागला . संबंध विचारतां " अस्माकं बदरीचक्रं युष्माकं बदरीतरुः । बादरायणसंबंधात् यूयं यूयं वयं वयम् ॥ ( सु . )
अर्थ असा कीं आमच्या गाडीचें चाक बोरीच्या लांकडाचें आहे व तुमच्या दारांत बोरीचें झाड आहे हा बादरायण संबंध .
नव्याण्णव बादी - शेंकडा नव्वाण्णव अथवा बहुधा कांहींतरी थाप देऊन वेळ मारून नेणारास म्हणतात .
भगीरथ प्रयत्न - राजा भगीरथानें आपले पूर्वज सगरपुत्र यांस मोक्ष मिळावा याकरितां दीर्घ तपस्या करून स्वर्गातून गंगेला भूलोकीं आणिली . या कथेवरून दीर्घ परिश्रमानें अचाट कार्य साध्य करणें असा अर्थ .
भाऊगर्दी - अहमदशहा अबदालीव मराठे यांच्यांत झालेल्या पानिपतच्या युद्धांत ( इ . स . १७६१ ) विश्वासराव गोळी लागून ठार झाल्यानंतर मराठयांचे सर सेनापति सदाशिवरावभाऊ पेशवे अखेरच्या क्षणीं घोडयावरून पाय उतार होऊन लढततं लढतां त्या एकंदर धुमश्चकींत दिसेनासे झाले व नंतर जो गोंधळ व गर्दी होऊन नाश ओढवला त्यास अनुलक्षून म्हणतात .
मल्लिनाथी - मल्लिनाथ हा संस्कृत साहित्यांतील एक प्रसिद्ध टीकाकार . यानें रघुवंश , किरात , माघ वगैरे अनेक ग्रंथांवर टीका लिहिल्या असल्यामुळें मल्लिनाथी म्हणजे टीका हा अर्थ रूढ झाला .
मारुतीचें शेपूट - मारुतीचें शेपूट जाळून टाकण्याची आज्ञा रावणानें केल्यावेळी शेपूट आणखी लांबूच लागलें संपेचना यावरून लांबत जाणारे काम .
मातृषोडशी - मातृगयेस जाऊन प्रसूति वेदनादि अनेकानेक कष्ट सोसलेल्या मातेचें ऋण फेडण्याच्या हेतूनें द्यावयाचे सोळा पिंडदानास म्हणतात . ( श्राद्धप्रयोग )
लक्ष्मण रेषा - लक्ष्मणानें सीतेस रेषा ओढून दिली होती व त्या रेषेच्या बाहेर न जाण्यास सांगितलें होतें , व तसें न केल्यास धोका होईल असें बजावलें होतें . यावरून विशिष्ट मर्यादेचें उल्लंघन झाल्यास धोका अटळ .
असा संकेत .
विश्वामित्री सृष्टि - ब्रह्मदेवाशीं स्पर्धा करून विश्वामित्रानें प्रतिसृष्टि निर्मान केली अशी कथा आहे . मनुष्याच्या डोक्यासारखा नारळ , गाईऐवजी म्हैस , घोडयाऐवजीं गाढव हीं त्याचीं उदाहरणें आहेत .
विश्वामित्राचा उन्हाळा - आश्विन शु . १५ ते कार्तिक शु . १५ हा शरद् ऋतूचा मध्याकाल .
शतपथ - " शतं पंथानो मार्गा नाम अध्यायाः यस्य स शतपथः " महर्षि याज्ञवल्क्य यांचे नांवावर प्रसिद्ध असलेला शुक्ल यजुर्वेदावरील ब्राह्मण ग्रंथ यांत १०० अध्याय आहेत . म्हणून यास शतपथ हें अभिधान मिळालें आहे .
शिराळशेटी राज्य - शिराळशेट नांवाचा एक वाणी . दुर्गादेवीचे दुष्काळांत अनेक लोकांचे प्राण वांचविल्याबद्दल - त्यास साडेतीन घटका विजापुरास राज्य करण्याची संधी मिळाली व तेवढया वेळांत त्यानें अनेक दानधर्म केले . अशी आख्यायिका आहे . यावरून लक्षणेनें अल्पकालीन वैभव असा अर्थ रूढ झाला .
सुवर्णमध्य - दोन परस्परविरुद्ध गोष्टीतून काढलेला मध्यम मार्ग म्हणजे तडजोड असा अर्थ .
सत्कार्यवाद - कार्य प्रकट होण्याच्या पूर्वी त्याचे कारणामध्ये अस्तित्व मानणारें निरीश्वर सांख्यमत ( म . श . को . )
हे - बायकोनें नवर्याचें नाव घ्यावयाचें नसतें म्हणून पति या अथीं हा शब्द संकेतानें वापारला जातो . उदा . ’ आमचे हे ’ तसेंच ’ तिकडे ’ अथवा ’ स्वतां ’ असाहि प्रयोग केलेला आढळतो .