चार प्रकार शास्त्र वचनाचे - १ भयानक , २ रोचक , ३ अनुवाद व ४ तथार्थ ( बोधामृत ).
चार प्रकारची स्त्रीपुरुषांची प्रीति - १ नैसर्गि - स्वाभाविकपणें , २ विषयजा - पुष्पमाला , मेवामिठाई वगैरेमुळें , ३ समा - ललितकला वगैरेमुळें जडणारी आणि ४ अभ्यासजा - परस्परांच्या सारख्या संवयीनें व आवडी निवडीमुळें जडणारी ( अनंगरंग ).
चार प्रकारची शुचिता - १ द्रव्यशौच , २ मनःशौच , ३ बाक्शौच आणि ४ कामशौच .
चार प्रकार शैवांचे - १ सामान्यशैव , २ मिश्रशैव , ३ शुद्धशैव व ४ वीरशैव . ( वीरशैवान्वय चंद्रिका )
चार प्रकारची सिद्धावस्था - १ स्वप्रसिद्ध , २ मंत्रसिद्ध , ३ दैवसिद्ध आणि ४ नित्यसिद्ध ( श्रीरामकृष्ण वाक्सुधा )
चार प्रकार सूत्र ग्रंथांचे - १ श्रौतसूत्रें , २ गृह्मसूत्रें , ३ धर्मसूत्रें व ४ शुल्बसूत्रें - यज्ञकर्म .
चार प्रकार श्रद्धेचे - १ अध्यात्मश्रद्धा , २ कर्मश्रद्धा , ३ तामसीश्रद्धा व ४ निर्गुणश्रद्धा ( ए . भा . अ . २५ ओंवी ३५१ ते ३६८ )
चार प्रकारें सुवर्णपरीक्षा - १ कसोटीवर घासून , २ कापून , ३ तापवून व ४ हातोडीनें ठोकून , अशा चार प्रकारानीं करतां येते .
चार प्रकारचा संन्यास - १ विद्धत् , २ विविदिषा ३ मर्कट व ४ आतुर ( स्वामी - विवेकानंदांच्या सहवासांत )
चार प्रकारची संन्यासदीक्षा - १ कुटीचक ( आश्रमविहित कर्म करणारा ), २ बहूदक करणारा ) व ४ परमहंस ( ब्रह्मज्ञानी झालेला ).
’ दीक्षा असे ही चतुर्विध ’ ( गुरु - ली १३ - २४ ) ( विष्णु ४ - ११ )
चार प्रकारचे संबंध - १ संयोगसंबंध , २ समवायसंबंध , ३ तादात्म्यसंबंध व ४ भेदाभेद संबंध ( वैशिषिक शास्त्र )
चार प्रकारचे समास - १ अव्ययीभाव , २ तत्पुरुष , ३ बहुव्रीहि आणि ४ द्वंद्व . ( व्याकरण शास्त्र )
चार प्रकारचे संवाद ( ज्ञानेश्वरी ग्रंथांतर्गत )- १ श्रीकृष्णार्जुनसंवाद , २ धृतराष्ट्र - संजय , ३ श्रीज्ञानेश्वर - निवृत्तीनाथ आणि ४ श्रीगुरुखेरीज इतर श्रोते असे चार प्रकारचे संवाद ज्ञानेश्वरींत वर्णिले आहेत .
चार प्रकारचीं स्त्रियांचीं भूषणें - १ केशभूषा , २ वेशभूषा , ३ वस्त्रप्रावरण आणि ४ विलेपन ( अंगाला उटी लावणें ).
कचधार्यं देहधार्यं परिधेयं विलेपनम् ।
चतुर्धा भूषणं प्राहुः स्त्रीणामन्यच्च दैशिकम्॥ ( ससाकर )
चार प्रकारचें ज्ञान - १ शब्दज्ञान , २ अपरोक्षज्ञान , ३ सामान्यज्ञान व ४ विशेषज्ञान .
चार प्रमाणें - १ स्मृति , २ प्रत्यक्ष , ३ इतिहास व ४ अनुमान . स्मृतिः प्रत्यक्षमैतिह्मम । अनुमानश्चतुष्टयम ॥ ( तै , आ . १ - २ )
चार प्रमुख तत्त्वें ( झरतुष्ट्री धर्माचीं )- १ अहुरमज्द हा सर्वश्रेष्ठ देव व सर्वज्ञ , २ आत्मा अमर आहे , ३ विचार , उच्चार आणि आचार यांना आपणच जबाबदार मानणें व ४ असद् विचार , अपशब्द आणि कुकर्में यांचा शपथपूर्वक त्याग . ( गुजरात )
चार प्रमुख शिष्य श्री मध्वाचार्यांचे - १ पद्म्नाभतीर्थ , २ नरहरितीथे , ३ माधवतीर्थ व ४ अक्षोभ्यतीर्थ .
चार प्रमुख शिष्य व्यासांचे - १ वैशंपायन , २ पैल , ३ जैमिनि व ४ सुमन्तु .
’ सुमन्तुश्चेति चत्वारो व्यासशिष्या महौजसः ’ ( शिव - कैलास - अ . २३ )
चार प्रमुख प्रकार पर्वतांचे - १ वलीपर्वत किंवा घडीचे पर्वत , २ गठ पर्वत ३ अवशिष्ट पर्वत व ४ संचय पर्वत ( सुलभ - विज्ञान ).
चार प्रमुख विचार प्रवाह ’ भारतीय ’ तत्त्व प्रतिपादनाचे - १ जडाद्वैतपक्ष , २ शून्यवाद , ३ द्वैतवाद व ४ अद्वैतवाद . विविधविचार प्रवाहांची एकूण संख्या सुमारें ३८४ होती असें म्हणतात . त्यांतले हे चार प्रमुख होत . ( ब्रह्मसूत्रभाष्य - प्रस्तावना )
चार प्रमुख शिष्य श्रीशंकाराचार्यांचे - १ पद्मपादाचार्य , २ चित्सुखाचार्य , ३ आनंदगिरि व ४ सुरेश्वराचार्य .
चार प्रलय - १ नित्य , २ नैमित्तिक , ३ प्राकृतिक व ४ आत्यंतिक . ( दु . श . को . )
चार बहुमोल रत्नें - १ सवत्स कामधेनु , २ सुंदरस पलंग , ३ रत्नजडित दीप व ४ नागवेलीचीं पानें , हीं चार रत्नें पाताळलोकच्या राजा वासुकीनें भूलोकींच्या राजा उदयनाला आपल्या कन्येच्या विवाहप्रसंगीं हुंडा म्हणून दिलीं अशी कथा आहे . ( प्र . को . )
चार ब्रह्मवेत्ते - १ श्रीदत्तात्रेय , २ शुकाचार्य , ३ कपिलमुनि व ४ याज्ञवल्क्य , हे चार महान् ब्रह्मवेत्ते होऊन गेले .
चार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र - १ सनक , २ सनन्दन , ३ सनातन आणि ४ सनत्कुमार हे चार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ज्ञानी असून ते नैष्ठिक ब्रह्यचारी होते . ( भाग स्कंद ३ अ . १२ - ४ )
चार बौद्ध क्षेत्रें व त्यांची चार प्रतीकें - १ कपिलवस्तु - जन्मस्थान - छत्रीधारी घोडा . २ बुद्धगया - ज्ञानप्राति - बोधिवृक्ष , ३ सारनाथ - पहिले प्रवचन दिलें - धर्मचक्र . व ४ कुशीनगर - निर्याणस्थान - स्तूप .
चार ’ म ’ कार स्वभावसिद्धच असावे लागतात - १ मन , २ मनगट , ३ मेंदु आणि ४ माणुसकी . हे रक्तांत म्हणजे स्वभावांतच असावे लागतात .
चार मठ श्रीशंकराचार्यांचे - १ शृंगेरी मठ ( दक्षिणाम्नाय ) सांप्रदाय - भूरीवार , वेद - कृष्णयजु , तीर्थ - तुंगभद्रा , २ गोवर्धन मठ ( जगन्नाथपुरी पूर्वाग्नाय ) भोगवार , ऋग्वेद , महोदधी . ३ बदरीनारायण ( उत्तराम्नाय ) आनंदवार , अथर्वण , अलकनंदा आणि ४ द्वारकामट
( पश्चिमाम्नाय ) कीटवार सामवेद गोमतीतीर्थ . ( शंकराचार्य - चरित्र अ . ३४ )
चार मतें ( गायनाचीं )- १ शिवमत , २ ब्रह्ममत , ३ पिंगल नागमत व ४ हनुमंतमत .
चार महर्षि शैव शास्त्र सिद्धान्त प्रवचनकार - १ रुद्र , २ दधीच , ३ अगस्त्य आणि ४ उपमन्यु ( शिव . प . वा . संहिता अ . ३२ )
चार मार्ग आध्यात्मिक उन्नतीचे ( शैवपंथ )- १ दासमार्ग - पूजा वगैरे बाह्मोपचार करणें , २ क्रिया अथवा सत्पुत्रमार्ग - पुत्राप्रमाणें ईश्वसेवा करणें , ३ योगमार्ग - मानस पूजा व ध्यानधारणा आणि ४ सन्मार्ग ज्ञानमार्ग . ( प्रसाद जुन १९६३ ).
चार मार्ग ( महम्मादीय )- १ शरीयत - कर्ममार्ग , २ तरीकत् - उपासनामार्ग ३ हकीकत् - योगमार्ग आणि ४ मारफत् - ज्ञानमार्ग ( पंचग्रंथी ).
चार महावाक्यें ( भक्तिमार्गाचीं )- १ कृष्णस्तु भगवान् स्वयम , २ मत्तःपरतरं नान्यत् , ३ ब्रह्मणे प्रतिष्ठाहम व ४ मामेकं शरणं ब्रज .
( भागवत )
चार महावाक्यें ( वेदान्ताचीं )- १ प्रज्ञानं ब्रह्म ( ऋग्वेद ), २ अहं ब्रह्मासिस्म ( यजुर्वेद ), ३ तत्त्वमसि ( सामवेद ) व ४ अयमात्मा ब्रह्म
( अथर्वदेद ).
चार मानें ( परिमाण विश्चिति अथवा वजन लांबी इ . यांचें माप )- १ डावे - उजवें , २ मागेंपुढें , ३ वर - खालीं आणि ४ आधीं - नंतर .
( पंचागांतील ज्योतिःशास्त्र . )
चार मास तीर्थसद्दश अभीष्ट फल देणारे - १ आषाद , २ कार्तिक , ३ माघ व ४ वैशाख .
तत्राषाढः कार्तिकश्चा माघो वैशाख एव च ।
तीर्थान्युक्तानि मासा वै चत्वारोऽभीष्टदायकाः ॥ ( कल्याण - तीर्थांक . )
चार मित्र - १ विद्या - प्रवासांत , २ पत्नी - घरीं , ३ औषध - व्याधि - ग्रस्तावस्थेंत आणि ४ धर्म - अंतसमयीं .
विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्रं गृहेषु च ।
व्याधितस्योषधं मित्रं धर्मो मित्रं मृतस्य च ॥ ( सु . )
चार मुक्तिस्थानें - १ ब्रह्मज्ञान , २ गयाश्राद्ध , ३ गाईच्या गोठय़ांत मरण आणि ४ कुरुक्षेत्रनिवास .
ब्रह्मज्ञानं गयाश्राद्धं गोगृहे मरणं तथा ।
वासः पुंसां कुरुक्षेत्रे मुक्तिरेषा चतुर्विधा ॥ ( गयामहात्म्य )
चार मुद्रा - ( अ ) १ खेचरी , २ भूवरी , ३ चांचरी आणि ४ अगोचरी ; ( आ ) १ ध्यान , २ राधायंत्र , ३ षण्मुखी आणि ४ शांमवी .
चार मूळ गोत्रें - १ अंगिरस , २ कश्यप , ३ वसिष्ठ व ४ भृगु .
मूलगोत्राणि चत्वारि समुत्पन्नानि भारत ।
अङ्रिराः कश्यपश्वैव वसिष्ठो भृगुरेव च ॥ ( म . भा . शांति २९६ - १७ )
चार मोक्षद्वाराचे द्वारपाल - १ शम , २ विवेक , ३ संतोष व ४ साधु - समागम .
’ शमो विचाः संतोषश्चतुर्थः साधुसंगमः ’ ( सु . )
चार युगें -
१ कृतयुग - आरंम काल - कार्तिक शु० ९
२ त्रेतायुग - " वैशाख शु० ३
३ द्वापरयुग - " माध व - ३०
४ कलीयुग - " भाद्रपद व० १२ ( शिवनिबंध )
आद्यं कृतयुगं प्रोक्तं ततस्त्रेतायुगं बुधैः ।
तृतीयं द्वापरे पार्थ चतुर्थं कलिरुच्यते ॥ ( कुर्म २९ - ९ )
चार युगें - ( आ ) १ सुवर्णयुग , २ रजतयुग , ३ ब्राँझयुग आणि ४ लोहयुग ( ऑगस्टीन कालगणना ).
चार युगांतील चार अवतार ( महानुभाव )- १ दत्त ( कृत ), २ इंस ( त्रेता ), ३ कृष्ण ( द्वापर ) आणि ४ प्रशांत ( कलियुग - व्हावयाचा आहे . )
चार युगाचे चार स्मृतिकार - १ कृतयुग - मनु , २ त्रेतायुग - गौतम , ३ द्वापर - शंखलिखित आणि ४ कलियुग - पराशर ( प्रा . च . को . )
चार युगांतील चार प्रकारचा धर्म - १ कृत - तपःप्रधान , २ त्रेत - ज्ञानप्रधान , ३ द्वापर - यज्ञप्रधान आणि ४ कलि - दानप्रधान ( म . भा . शांति ३ - २३१ ).
चार युगांतील प्राणांचीं चार स्थानें - १ कृत अथवा सत्य युग - अस्थीमध्यें , २ त्रेता - मांसांत , ३ द्वापर - रक्तांत व ४ कलियुग - अन्नांत -( पराशर ).
चार योगभूमिका - १ वाणील्य , २ मनोलय , ३ बुद्धिलय व ४ अहंकारलय . ( विचारचंद्रोदय )
चार रत्नें - १ सूर्य - आकाशांत , २ बालक - घरीं , ३ स्त्री - शयनप्रसंगीं व ४ पडित - समेमध्यें .
आकाशे रविरत्नानि गृहरत्नानि बालकः ।
शयने स्त्रीरत्नानि सभारत्नानि पंडितः ॥ ( सु . )