मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|संकेत कोश|
संख्या ७

संकेत कोश - संख्या ७

हिंदू धर्मात असे अनेक संकेत आहेत ,जे आपल्या जीवनात मोलाचे कार्य बजावतात .


सात प्रकारचे दुष्टजन - १ सदोदित दुष्कृत्याकडे धांवणारा , २ धर्माकडे मुळींच लक्ष न देणारा , ३ झोपाळू , ४ व्यसनासक्त , ५ मद्यपि , ६ अगम्य स्त्रीशीं गमन करणार आणि ७ सदोदित दुष्टांशीं संभाषण करणारा .

अकार्ये भ्रमते नित्यं धर्मार्थे न व्यवस्थितः ।

निद्रलुर्व्यसनासक्तो मद्यपः स्त्रीनिषेवकः ।

दुष्टैःसह सदालापः स दुष्टः सप्तधा स्मृतः ॥ ( भविष्य - मघ्यम ५ - ५४ )

सात प्रकारचे देशविशेष - १ जंगली प्रदेश , २ गांव वसलेला प्रदेश , ३ डोंगराळ , ४ पाणथळीचा , ५ वाळवंटाचा , ६ पठार व ७ उंचसखल . असें युद्धशास्त्राच्या द्दष्टीनें सात प्रकारचे देशविशेष होत . ( कौटिल्य .

अधिकरण ९ - १ )

सात प्रकार प्राणायामाचे - १ रेचक , २ पूरक , ३ कुंभक , ४ उत्कर्ष , ५ अपकर्ष , ६ शून्य व ७ उत्क्रांति . ( परमानुभवबोध )

सात प्रकारांनीं मिळालेलें धन धर्मसंमत - १ परंपरागत म्हणजे वारसाहक्कानें मिळालेलें , २ निधिलाभ , ३ क्रयविक्रय , ४ विजय , ५ न्याय्य वृद्धि , ६ कृषि - वाणिज्य आणि ७ शास्त्र्संमत दान . ( मुन . १० - ११५ )

सात प्रकारचे यज्ञ - १ ब्रह्मयज्ञ , २ द्रव्ययज्ञ , ३ शरीरयज्ञ , ४ वाग्यज्ञ , ५ प्राणयज्ञ , ६ बुद्धियज्ञ , २ द्र्व्ययज्ञ , ३ शरीयज्ञ , ४ वाग्यज्ञ , ५ प्राणयज्ञ , ६ बुद्धियज्ञ , ७ कर्मयज्ञ .

सात प्रकारचें युद्ध - १ धनु , २ चक्र , ३ कुंत ( भाला ), ४ खड्‌‌ग , ५ क्षुरिका , ६ गदा आणि ७ बाहुयुद्ध . असे युद्धाचे सात प्रकार प्राचीन काळीं असत . ( जामदग्न्य धनुर्वेद अ . १ )

सात प्रकारच्या लज्जा - १ जनोलज्जा , २ मनोलज्जा , ३ वयोलज्जा , ४ धर्मलजा , ५ कर्मलज्जा , ६ जातिलज्जा आणि ७ कुललज्जा .

सात प्रकारच्या लज्जा - १ जनोलज्जा , २ मनोलज्जा , ३ वयोलज्जा , ४ धर्मलज्जा , ५ कर्मलज्जा , ६ जातिलज्जा आणि ७ कुललज्जा .

सात प्रकारचें वायु अंतरिक्षांतलें - १ आवह - भूगीपासून मेघ - मंडलापर्यत , २ प्रवह - मेघमंडलापासून सूर्यमंडला पर्यंत , ३ उद्वह - तिसर्‍या मंडलांतील , ४ संवह - चंद्रमंडलापासून नक्षत्रमंडलापर्यंत , ५ विवह - नक्षत्र - मंडलापर्यंत , ६ षष्टापरा अथवा परिवह - शनिमंडलापासून सप्तर्षिपर्यंत , आणि ७ परावह - सप्तर्षिपासून ध्रुवापर्यंत . असे अंतरिक्षांत संचारणारे वायुमंडलाचे सात मार्ग वा सात भाग आहेत . यांसच सप्तस्कंध असेंहि म्हणतात .

परावहो नाम वरो वायुः स दुरतिक्रमः ।

एवमेते दितेः पुत्रा मरूतः परमाद्‌‌भुताःअ ॥ ( बृहन्नारदीय पूर्व ६० - ३२ )

सात विपर्यास ( दोष ) चित्र संबंधीं - १ युगविपर्यास , २ ऋतु - विपर्यास ३ कालविपर्यास , ४ वस्तुविपर्यास , ५ चालीरीतींचा विपर्यास , ६ स्थानविपर्यास , व ७ जातिविपर्यास . असे सात दोष चित्रसंबंधीं मानले आहेत . ते चित्रकारानें टाळावेत . ( म . ज्ञा . को . वि . १३ )

सात शिष्यवर श्रीकृष्णाचे - १ ब्रह्मा , २ मन , ३ वेदव्यास , ४ दैवव्यास , ५ अर्जुन , ६ उद्धव आणि ७ भीष्म .

अर्जुन आणि उद्धव । गंगासुत भीष्मदेव ।

हे सप्त शिष्य जाणव । श्रीकृष्णाचे ॥ ( दर्शनप्रकाश )

सात प्रकारचे विडे - १ कातरविडा , २ कापूरविडा , ३ कुलपीविडा , ४ गोविंदविडा , ५ गोंदविडा , ६ मोडविडा आणि ७ मोदकविडा . यांखेरीज बोंडीविडा , गोपाळविडा असे आणखी कांहीं प्रकार आहेत .

सात प्रकारच्या व्याघि - १ आदिबलप्रवृत्त - आनुवंशिक , २ जन्मबलप्रवृत्त , ३ दोषबलप्रवृत , ४ संघातबलप्रवृत्त - अपघात वगैरेमुळें होणारे , ५ कालबलप्रवृत्त - स्वामाविक ऋतुमानामुळेंज उत्पन्न होणारे , ६ दैवबलप्रवृत्त आणि ७ स्वमाबबलप्रवृत्त म्हणजे तहान , भूक , निद्रा इत्यादि शरीरधर्मामुळें स्वामाविकपणें होणारे व्याधींचे सात प्रकार . ( सुश्रुत - शारीर )

सात प्रकार शैवांचे - १ अनादिशैव ( शिव ) ३ आदिशैव - कौशि - कादिऋषि , ३ महाशैव - द्विजवुलसमस्त , ४ क्षेत्री ( क्षत्रिय ) अनुमवशैव , ५ शूद्र - अवतारशैव , ६ प्रवरशैव - विशेष जाति समस्त आणि ७ अंतरशैव - अंबष्ठादिसमस्त . ( विवेक चिंतामणि )

सात प्रकारचे संतान - ( अ ) १ विहीर बांधणें , २ तलाव बांधणें , ३ उद्यान तयार करणें , ४ समागृह बांधणें , ५ पाणपोई , ६ सत्पात्रीं धर्म व ७ पुत्रोत्पत्ति , असें सात प्रकारचें संतान म्हणून सांगितलें आहे .

कूपस्तडागमुद्यानं मंडपं च प्रपा तथा ।

सद्धर्मकरणं पुत्रः संतानं सप्तधोच्यते ॥ ( वै . म . ३ - ३४ )

( आ ) १ मुलीचा मुलगा , २ पाळलेला मुलगा , ३ शिष्य , ४ उद्यान , ५ विहीर वा जलाशय निर्माण करणें , ६ अभिजात ग्रंथ निर्मिति व ७ प्रत्यक्ष पुत्र असे सात प्रकार होत .

दौहित्रः पोषितः शिष्य आरामश्च जलाशयः ।

सद्‌‌ग्रंथकरणं पुत्रः सप्तपुत्राः प्रकीर्तिताः ॥ ( आनंद रामायण )

सात प्रकारच्या संवेदना ( मानसशास्त्र )- १ जीवनन्यापी संवेदना , २ त्वचिक संवेदना , ३ चलन - संवेदना , ४ रस - संवेदना , ५ गंध - संवेदना , ६ ध्वनि - संवेदना आणि ७ द्दष्टि - संवेदना .

सात प्रकारचे साधकांचे अधिकार - १ दीक्षा , २ महादीक्षा , ३ पुरश्चरण , ४ महापुरश्चरण , ५ अभिषेक , ६ महाभिषेक व ७ तद्भाव .

सात प्रकार साक्षात्कारी पुरुषांचे - १ रूपदर्शी , २ तेजोदर्शी , ३ वर्णदर्शी , ४ नादश्रवा , ५ रसास्वादी , ६ स्पर्शानुमवी आणि ७ गंधानुमवी ( रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान )

सात प्रकारचे स्वर काढणारे सात प्राणी - १ षड्‌‍ज - मजूर , २ रिषम - वृषम , ३ गंधार - अज , ४ मध्यम - कौंच , ५ पंचम - कोकिळा , ६ धैवत - हय आणि ७ निषाद - गज . सा , री , ग , म , प , ध , नी - या सप्त स्वरांची पुरातन शास्त्रीय उपपत्ति अशी मानिली आहे . ( गायनाचार्य माला )

सात प्रकार स्वप्नांचे - १ भविष्यसूचक , २ प्रतीकात्मक , ३ परप्रेरीत , ४ भूतकालदर्शक , ५ दुसर्‍यासंबंधीं , ६ मिश्च व ७ चमत्कारिक स्वप्नें , ( मॅडम ब्लॅव्हटस्की )

सत प्रकारच्या हुंडया - १ दर्शनी हुंडी , २ मुदतहुंडी , ३ शाहजोग - हुंडी , ४ नामजोग हुंडी ५ धनीजोग हुंडी , ६ जोखमी हुंडी आणि ७ जबाबी ( बँका आणि त्यांचे व्यवहार )

सात प्रकृति - विकृति तत्त्वें - १ महत् ‌‍- बुद्धि , २ अहंकार आणि ५ पंच तन्मात्रा ( मिसळ न होतां प्रत्येक गुणाची अतिसूक्ष्म मूल स्वरूपें ) ( सांख्य कारिका ३ , गी . र . १७८ )

सात प्रकार औषधी ( आयुर्वेदीय ) तयार करण्याचे - १ पुटपाक , २ गर्तपाक , ३ वेणुपाक , ४ दोलपाक , ५ खर्परपाक , ६ बैजयूरपाक व ७ कालपाक ( गंधसार )

सात प्रकार कीर्तीचे - १ दानकीर्ति , २ पुण्यकीर्ति , ३ काव्यकीर्ति , ४ वक्तृत्वकीर्ति , ५ वर्त्नकीर्ति , ६ शौर्यकीर्ति व ७ विद्वज्जनकीर्ति .

( वस्तुरत्न कोश )

सात प्रमुख धर्म ( जगांतील )- १ वैदिक धर्म ( सनातन ), २ क्न्फ्यूशियस ( चीन ), ३ जैन धर्म , ४ बौद्ध धर्म , ५ झरतुष्ट्र धर्म , ६ खिरस्ती धर्म व ७ महमदी धर्म .

सात प्रमुख पद्धति योगाच्या - १ ह्ठयोग , २ भक्तियोग , ३ मंत्रयोग , ४ कर्मयोग , ५ ज्ञानयोग , ६ राजयोग , व ७ लयक्रियायोग ,

( Yoga explained )

सात प्रमुख प्रकार निबंध वाङमयाचे - १ विवरणात्मक , २ वर्णनात्मक , ५ विवेचनात्मक , ४ व्याख्यात्मक , ५ आलोचनात्मक , ६ साहित्यिक - गंभीर निबंध व ७ ललित निबंध ( निबंध प्रबोध )

सात प्रलयकालचे मेघ - १ संवर्त , २ भीमनाद , ३ द्रोण , ४ चंड , ५ बलाहक , ६ विद्युत्पताक व ७ शोण . ( मत्स्य . २ - ८ )

सात प्रसंगीं वपन विहित आहे - १ गंगातीरीं , २ भास्करक्षेत्रांत ३ माता , ४ पिता , ५ गुरु यांच्या निधनप्रसंगीं , ६ अग्न्याधानकाळीं व ७ सोमयाग . अशा सात प्रसंगीं धर्मशास्त्रानें वपन विहित मानिलें आहे .

गंगायां भास्करक्षेत्रे मातापित्रोर्गुरोर्मुते ।

आधानकाले सोमे च वपनं सप्त सुस्मृतम् ‌‍ ॥ ( मिताक्षरा ३ - १० )

सात भूमिका ( अज्ञानाच्या )- १ बीजजाग्रत् ‌‍ , २ जाग्रत् ‌‍, ३ महाजग्रत , , ४ जाग्रत , ५ स्वप्न , ६ स्वप्नजाग्रत् ‌‍ आणि ७ सुषप्त या अज्ञानाच्या सात भुमिका आहेत . ( यो . वा . )

सात प्राण मस्तकाचे ठिकाणीं असलेले - १ - २ कान , ३ - ४ दोन डोळे , ५ - ६ दोन नाकपुडया व ७ वाणी हे सात प्राण होत . ( तैत्तिरीय श्रुति ) " सप्त वै शीर्षण्यः प्राणाः "

सात भूमिका मनुष्य जीवनांतल्या - १ बाल्य , २ पौगंड , ३ प्रेमिक , ४ सैनिक , ५ चाळिशी उलटलेली , ६ न्यायाधीश व ७ वृद्धावस्था , जग ही एक रंगभूमि असून तींत मानवजीवनांतल्या या सात भूमिका असतात . ( As you like it )

सात भूमिका योग्याच्या योगाच्या - १ श्रवण , २ मनन , ३ निदिध्यासन , ४ विलापनी , ५ आनंद स्वरूपाची प्राप्ती , ६ स्वसंवेदनरूप तुर्यावस्था व ७ केवल विदेह - मुक्ति ( तुर्यातीत अवस्था ) ( यो वा . निर्वाण प्रकरण )

सात मित्रदूषणें - १ गुह्म प्रकट करणें , २ याचना , ३ निष्ठुरता धरणें , ४ चंचल स्बभाव , ५ राग , ६ खोटें भाषण आणि ७ जुगार ,

रहस्यमेदो याच्ञा च नैष्ठूर्यं चलचित्तता ।

क्रोधो निःसत्यता द्यूतमेतद्वै मित्रदूषणम् ‌‍ ॥ ( सु . )

सात मुद्रा - १ खेचरी , २ भूचरी , ३ चाचरी , ४ अलक्ष , ५ अगोचरी , ६ त्राटक आणि ७ षण्मुखी मुद्रा . ( योगशास्त्र )

सात मूलभूत गंध घ्राणोंद्रियाला समजणारे - १ अगदीं तरल गंध , २ कर्पूरासमान गध , ३ कस्तूरीसमान , ४ पुष्प गंध , ५ पुदीना वर्ग ६ तिखट आणि ७ दुर्गंध . इतर सर्व गंध या मूलभूत सात गंधाच्या मिश्रणानें बनले आहेत . ( चित्रमयजगत् ‌‌, आगष्ट १९६३ )

सात मोक्षधर्मप्रवर्तक - १ सन , २ सनत्सुजात ३ सनक , ४ सनंदन , ४ सनत्कुमार , ६ सनातन आणि ७ कपिल . हे सात प्रमुख सांख्यज्ञानविशारद व मोक्षधर्मप्रवर्तक होत .

एते योगविदो मुख्याः सांख्यज्ञानविशारदाः ।

आचार्या धर्मशास्त्रषु मोक्षधर्मप्रवर्तकाः ॥ ( सु . )

सात मंत्रसिद्धीचे उपाय - १ भ्रामण , २ रोधन ३ वश्य , ४ पीडन , ५ पोषण , ६ शोषण आणि ७ दाहन . ( कल्याण साधनांक )

सात यज्ञ - १ अग्निष्टोम , २ अश्वमेध , ३ बहुसुवर्णक , ४ राजसूय , ५ गोमेध , ६ वैष्णव आणि ७ माहेश्वर , असे सात प्रकारचे यज्ञ करून रावणपुत्र इंद्रजितानें सिद्धि मिळालेली होती . ( भा . रा . उत्तर . अ . २९ )

N/A

References : N/A
Last Updated : April 20, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP