बाहात्तर कोठडया ( देहांतील )- ४ आधारचक्रीं , ६ स्वाधिष्ठानीं , १० मणिपुरी , १२ अनुहाती , १६ कंठीं म्हणजे विशुद्धचक्र , २ अग्निचक्रीं , २१ पश्चिममार्गी आणि १ ऊर्ध्व . ( पंचीकरण ).
बाहात्तर दिवस रामा - रावण युद्ध - माघशुद्ध २ पासून चैत्र कृष्ण चतुर्दशी पर्यंत ८७ दिवसांत युद्ध फक्त १५ दिवस बंद होतें म्हणून हें युद्ध एकंदर ७२ दिवस झालें . ( गूढार्थ चंद्रिका )
बहात्तर यक्षप्रश्रः - पांडव वनवासांत द्वैतवनांत असतांना तृषाहरणासाठीं एका सरोवराकडे गेल्यावेळीं तेथील जलप्राशन करणार इतक्यांत अंतरिक्षांतून यक्षवाणी झाली कीं , माझ्या प्रश्नांचें उत्तर देईल , त्यानेंच हें जल प्राशन करावें असा माझा नियम आहे . परंतु क्रमानें नकुल , सहदेव , अर्जन व भीम या चौघांनींहि यक्षप्रश्नाचें उत्तर न देतां जलप्राशन केल्यामुळें ते गतप्राण होऊन पडले . शेवटीं युधिष्ठिरानें त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांचीं समर्पक उत्तरें दिल्यावर ते चौघेहि धर्माचे भ्राते जिवंत झाले . हा भाग महाभारतांत आरण्यक पर्वांत आला आहे . यक्ष व युधिष्ठिर यांच्यामधील ही प्रश्नोत्तरमालिका आत्मतत्त्वाचा निर्णय करण्यासाठीं आरंमिली आहे . प्रश्न व उत्तरें खालील प्रमाणें :-
१ सूर्याला कोण उदित करतो ?- ब्रह्मापासून सूर्याचा उदय होतो .
२ त्याचे साहाय्यकर्ते कोण ?- देव हे त्याचे साहाय्यकर्तं .
३ त्याला अस्तास कोण नेतो ?- धर्म .
४ तो कशाच्या आधारानें असतो ?- सत्याच्या आधारानें .
५ पुरुष कशानें श्रोत्रिय होतो ?- वेदाध्ययन केल्यानें .
६ त्याला ब्रह्मप्राप्ति कशानें होतें ?- तपानें .
७ तो साहाय्यवान् कशानें होतो ?- धैर्याच्या योगानें .
८ तो बुद्धिमान् कशानें होतो ?- वृद्ध आचार्यांच्या सेवेनें .
९ ब्राह्मणांचें देवत्व कोणतें ?- स्वाध्याय .
१० त्यांचें सदाचरण कोणतें ?- तपश्चर्या .
११ त्यांच मानवी भाव कोणता ?- मरण .
१२ त्यांचें असदाचरण कोणतें ?- परनिंदा .
१३ क्षत्रियांचें देवत्व कोणतें ?- धनुर्विद्या .
१४ त्यांचा परंपरागत धर्म कोणता ?- यज्ञ करणें .
१५ त्यांचा मानवी भावा कोणता ?- युद्धांत भय व पलायन .
१६ त्यांचा असदाचरण कोणतें ?- शरणगताचें रक्षण न करणें .
१७ यज्ञासंबंधीं साम कोणतें ?- प्राण .
१८ तत्संबंधीं मुख्य यजुर्मंत्र कोणता ?- मन .
१९ यज्ञाला आधारभूत असें एक काय आहे ?- ऋग्वेद .
२० कशाशिवाय यज्ञाचें अस्तित्व असूं शकत नाहीं ?- ऋग्वेदाशिवाय .
२१ सर्व प्रकारें तृप्ति करणारांमध्यें श्रेष्ठ कोण ?- पर्जन्य .
२२ पितरांचें संतर्पण करणारांत उत्तम कोण ?- बीज .
२३ इहलोकीं स्वस्थतेची इच्छा करणारांना साधन काय ?- गाय .
२४ संततीची इच्छा कराणारांना श्रेष्ठ काय ?- पुत्र .
२५ कोणता पुरुष जिवंत असून मृतवत् ?- देवता , अतिथि , सेवक , पितर आणि आत्मा या पांचांना जो कांहींच अपर्ण करीत नाहीं तो .
२६ पृथ्वीपेक्षां श्रेष्ठ काय ?- माता .
२७ आकाशापेक्षां उंच काय ?- पिता .
२८ बाय़ूपेक्षां चंचल काय ?- मन .
२९ मनुष्याला सर्वांत वाढत जाणारी गोष्ट कोणती ?- चिंता .
३० निद्रेंतहि डोळे मिटत नाहींत असा कोण ?- मत्स्य .
३१ उत्पन्न झालें असतां हालचाल नसतें असें काय ?- अंडें .
३२ कोणाला ह्रदय नाहीं ?- दगडाला .
३३ वेगानें वाढतें कोण ?- नदी .
३४ प्रवाशाला मित्र कोण ?- समुदायानें असणें .
३५ सज्जनाला घरीं मित्र कोण ?- भार्या .
३६ रोग्याला मित्र कोण ?- औषध .
३७ आसन्नमरण झालेल्यास मित्र कोण ?- दान .
३८ एकाकी मार्ग क्रमनारा कोन ?- सूर्य .
३९ पुनः पुनः जन्म घेणारा कोण ?- चंद्र .
४० शीताला औषध कोणतें ?- अग्नि .
४१ सर्वांत मोठें उत्पत्तिस्थान कोणतें ?- भूमि .
४२ धर्माच्या पर्यवसानाचें मुख्या स्थान कोणतें ?- दक्षता .
४३ यशःप्राप्तीचें मुख साधन कोणतें ?- दान .
४४ स्वर्गप्राप्तीचें मुख्य साधन काय ?- सत्य .
४५ सुखाचें मुख्य निधान कोणतें ?- शील .
४६ मनुष्याचा आत्मा कोण ?- पुत्र .
४७ त्याचा दैवानें दिलेला मित्र कोणता ?- भार्या .
४८ त्याचें जीवन कोणतें ?- पर्जन्य .
४९ त्याला मुख्य आधार काय आहे ?- दान .
५० द्र्व्यप्राप्तीच्या साधनांत उत्तम साधन कोणतें ?- दक्षता .
५१ उत्तम धन कोणतें ?- विद्याधन .
५२ उत्तम लाभ कोणता ?- आरोग्य .
५३ श्रेष्ठ सुख कोणतें ?- समाधान .
५४ इह लोकीं श्रेष्ठ धर्म कोणता ?- आश्रितांचें रक्षण .
५७ अक्षय्य फलद्रूप होणारा धर्म कोणता ?- वैदिक धर्म .
५७ कशाचें नियमन केलें आसतां दुःख करण्याची पाळी येत नाहीं ?- मनःसंयमन .
५८ कोणाची संगति केली असतां वाया जात नाहीं ?- सज्जनांची संगति .
५९ कशाच्या त्यागानें मनुष्य प्रिय होतो ?- वृथा मान .
६० शोक कराण्याचा प्रसंग काय टाळल्यानें येत नाहीं ?- क्रोध .
६१ कोणत्या त्यागानें मनुष्य संपत्तिमान होतो ?- आशा .
६२ कशाचा त्याग केल्यातें तो मुखी होतो ?- लोभ .
६३ मृत पुरुष कोणता ?- दरिद्री .
६४ राष्ट्र मृत कशानें होतें ?- अराजकानें .
६५ मृत श्राद्व कोणतें ?- अधीत्त ब्राह्मणाभावीं .
६६ मृत यज्ञ कोणता ?- दक्षिणारहित .
६७ कोठून आलेलें पाणी श्रेष्ठ ?- आकाशापासून .
६८ अन्न कोणतें ?- गोदुग्ध .
६९ विष कोणतें ?- याचना .
७० श्राद्धाला योग्य काल कोणता ?- खाध्यायतत्पर ब्राह्मणाची अनुकुलता .
७१ सर्व संपत्तिमान् असा पुरुष कोणता ?- ज्याची कीर्ति दिगंत गाजत आहे असा , प्रिय व अप्रिय , सुख व दुःख तसेंच येऊन गेलेलें व भावी सुख - दुख हीं समान लेखणारा पुरुष . सर्व संपत्तीनें युक्त होय . ( म . भा . संशोधित आवृत्ति आरण्यकपर्व भाग २ अ . २९७ )
बाहात्तर रोग - बहात्तर रोगांवर एकच औषध अशी म्हण आहे . तिचा इत्यर्थ इतकाच कीं मानव शरीरांतील रोगपरिगणन प्राचीनांनीं बहारत्तर मानिलें आहे . शास्त्रीय शोधामुळें पोटमेद अनेक वाढले असले तरी प्रधान रोग बहात्तरच आहेत . ते असें :- १ अजीर्ण , २ अग्निमांद्य , ३ अतिसार , ४ अपस्मार , ५ अर्बुद ( आवाळु ) ६ अमांश , ७ अरुचि , ८ आनाह , ( मलबद्धतारोग ) ९ अंडवृद्धि , १० आमवात , ११ आम्लपित्त , १२ उचकी , १३ उदररोग , १४ उदावर्त्त , १५ उन्माद , १६ उपदंश , १७ ऊरुस्तंभ , १८ कर्णरोग , १९ कफरोग . २० कावीळ , २१ कास ( खोकला ), २२ कुष्ठ , २३ कृमिरोग , २४ गलगंड , २५ गुल्म , २६ गंडमाळा , २७ तृपा , २८ दाहरोग , २९ द्दष्टिरोग , ३० नासारोग , ३१ नेत्ररोग , ३२ पांडुरोग , ३३ पित्तरोग , ३४ प्रमेह , ३५ बालरोग , ३६ भगेंद्र , ३७ मस्तकरोग , ३८ मुखरोग , ३९ मूर्च्छा , ४० मूत्ररोग , ४१ मूळव्याध , ४२ मूढगर्म , ४३ मेदोरोग , ४४ रक्तपित्त , ४५ रक्तदोष , ४६ रक्तवृद्धि , ४७ राजयक्षमा , ४८ योनिकंद , ४९ वातरक्ता , ५० वातरोग , ५१ वांति , ५२ विद्रधि , ५३ विषचिकित्सा , ५४ विषूचिका , ५५ विसर्प , ५६ विस्फोट , ५७ व्रणरोग , ५८ शूकरोग , ५९ शूळ , ६० श्वास व दमा , ६१ श्लीपद , ६२ सूज , ( शोथ ) ६३ संग्रहणी , ६४ स्मृतिनाश , ६५ स्वरभेद , ६६ स्त्रीरोग , ६७ शीतपित्त , ६८ सूतिकारोग , ६९ स्वतरोग , ७० स्तन्यदुष्टी , ७१ ह्रदोग आणि ७२ क्षयरोग . ( माधव निदान ) बहात्तर रोगावर एकच औषध असा एक जुना संकेत रूढ आहे .
बाहात्तर कला - १ गीतकला , २ वाद्यकला , ३ नृत्यकला , ४ गणितकला , ५ पठितकला , ६ लिखितकला , ७ वक्तृत्त्वकला , ८ कवित्वकला , ९ कथाकला , १० वचनकला , ११ नाटककला , १२ व्याकरणकला , १३ छंदःकला , १४ अलंकारकला , १५ दर्शनकला , १६ अभिघानकला , १७ धातुवादकला , १८ धर्मकला , १९ अर्थकला , २० कामकला , २१ बादकला , २२ बुद्धिकला , २३ शौचकला , २४ विचारकला २५ नेपथ्यकला , २६ विलासकला , २७ नीतिकला , २८ शकुनकला , २९ क्रीतकला , ३० वितकला , ३१ संयोगकला , ३२ ह्स्तलाघवकला , ३३ सूत्रकला , ३४ कुसुमकला , ३५ इंद्रजालकला . ३६ सूचिकर्मकला , ३७ स्नेहकला , ३८ पानककला , ३९ आहारककला , ४० सौमाग्य़कला . ४१ प्रयोगकला , ४२ मंत्रकला , ४३ वास्तुकला , ४४ वाणिज्यकला , ४५ रत्नकला , ४६ पात्रकला , ४७ वैद्यकला , ४८ देशकला , ४९ देशभाषितकला , ५० विजयकला , ५१ आयुधकला , ५२ युद्धकला , ५३ समयकला , ५४ वर्तनकला , ५५ हस्तिकला , ५६ तुरगकला , ५७ नारीकला , ५८ पक्षिकला , ५९ भूमिकला , ६० लेपकला , ६१ काष्टकला , ६२ पुरुषकला , ६३ सौन्यकला , ६४ वृक्षकला , ६५ छद्मकला , ६६ हस्तकला , ६७ उत्तरकला , ६८ प्रत्त्युत्तरकला , ६९ शरीरकला , ७० सत्त्व - कला . ७१ शास्त्रकला व ७२ लक्षणकला ( वस्तुरत्नकोश )