चार अंगें ( आत्मज्ञानाचीं )- १ इच्छाशक्ति , २ प्रज्ञा , ३ नीतिज्ञान व ४ श्रद्ध . ( कल्यान ईश्वरांक )
चार अंगें ह्ठयोगाचीं - १ आसन २ प्राणायाम , ३ मुद्रा व ४ नादानुसंधान ( कबीर दोहावली )
चार अंगें ( सहिष्णुतेचीं )- १ द्वंद्वसहिष्णुता , २ वेगसहिष्णुता , ३ परोत्कर्षसहिष्णुता आणि ४ परमतसहिष्णुता ,
चार अपाय श्रवणास - १ लय - निद्रा , २ विक्षेप - वृत्तीची बहिर्मुखता , ३ कषाय - राग द्वेष इत्यादिकांचे योगानें चित्त स्तब्ध होणें , व ४ रसस्वाद - प्रसंगोपात्त आलेलीं वर्णनें तींच तींच ऐकण्याविषयींची आसक्ति ( ए . भा . ११ - ७०५ )
चार अवस्था - ( अ ) १ जागृति ( सृष्टीच्या विविधतेचा अनुभव ), २ स्वप्र , ३ सुषुप्ति ( अद्वैताचा अनुभव ) आणि ४ तुर्या ( शु्द्धावस्था );
( आ ) १ बाल्य , २ पौगंड , ३ तारुण्य आणि ४ वार्धक्य . यांना अवस्था - चतुष्टय म्हणतात .
चार अवस्थांतील चार गोष्टींचा कधींच मेळ बसत नाहीं - १ बाळपणच्या कल्पना , २ तारुण्यांतील मनोराज्यें , ३ प्रौढपणींचे विचार आणि ४ वार्धक्यांतील भावना .
चार अवस्था फोटोच्या - १ प्रकाश दर्शन , २ विकसन , ३ प्रस्थापन व ४ मुद्रण . फोटो घेण्यापासून तो तयार हिईपर्यंत या चार अवस्थांतून जावें लागतें . ( सुलभ फोटोग्राफी )
चार अवस्था आनंदाच्या - १ आनंद , २ परमानंद , ३ विरमानंद आणि ४ सहजानंद .
चार अवस्था मोक्षमार्गावरील - १ बद्ध , २ मुमुक्षु , ३ साधक आणि ४ सिद्ध ,
चार अवस्था वास्नांच्या - १ प्रसुप्तवासना , २ तनुवासना २ विच्छिन्न - वासना आणि ४ उदार वासना ( पा . योग - साधनपाद )
चार अवस्था स्त्रियांच्या वयपरत्वें - १ बाला - बारा वर्षेपर्यंत २ प्रौढ - बारा ते चोवीस वर्षें , ३ मुग्धा - चोवीस ते बत्तीस आणि ४ प्रगल्भा - बत्तीसपासून चाळीस वर्षेपर्यंत ( मूळस्तंभ )
चार अवस्था साधकांच्या - बाल , २ उन्मत्त , ३ पिशाचवत् आणि ४ सहजावस्था ( रवींद्र्वीणा )
चार अवतार श्रीदत्ताचे - १ श्रीदत्त , २ श्रीपाद श्रीवल्लभ , ३ श्रीनृसिंह सरस्वती आणि ४ अक्कलकोटचे स्वामी . ( माऊली विशेषांक )
चार अरण्यें - १ दंडकारण्य़ , २ स्वकारण्य , ३ नैमिषारण्य आणि ४ धर्मारण्य . हीं पूर्वकालीं भारतवर्षांतर्गत जंबुद्वीपांतील चार अरण्यें होतीं . ( मूळस्तंभ )
चार अश्व ( श्रीकृष्णाच्या रथाचे )- शैब्य , २ सुग्रीव , ३ मेघ - पुष्प व ४ बलाहक ( म . भा . उद्योग ८३ - १९ )
चार आदर्श कामिनींचे - १ जूनो , २ व्हीनस , ३ मिनर्व्हा आणि ४ डायना असे चार आदर्श ग्रीक रोमन समाजानें कल्पिले आहेत .
( आ ) वैदिकांचे मतें - १ मानिनी - सती , २ रूप्सम्राज्ञी - रति , ३ शारदा व ४ युद्ध - प्रिया - दुर्गा हे होता . ( अशोक ते कालिदास )
चार आश्रम - १ ब्रह्मचर्याश्रम , २ गृहस्थाश्रम , ३ वानप्रस्थाश्रम आणि ४ संन्यासाश्रम . ’ एते गृहस्थप्रभवाश्वत्वारः पृथगाश्रमाः
( मनु ६ - ८७ )
चार आर्य सत्यें - ( बौद्ध धर्म )- १ जग दुःखाचाहि ( निरोध होतो आणि ४ दुःअखनिरोध शक्य तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग .
चार आचार्य ( वैष्णव सांप्रदायाचे )- १ विष्णुस्वामी , २ निंबार्क , ३ मध्वाचार्य आणि ४ रामानुजाचार्य , हे चारहि वैष्णव सांप्रदायप्रवर्तक दक्षिण भारतांत होऊन गेले .
विष्णुस्वामी प्रथमतो निंबादित्यो द्वितीयकः ।
मध्वाचार्यस्तृतीयस्तु चतुर्थो रामानुजस्तथा ॥
चार आचार्यपीठें ( मठ ) ( श्रीशंकराचार्य स्थापित )- १ पूर्वेस - जगन्नाथ पुरी - गोवर्धन मठ , २ पश्चिमेस - द्वारका - शारदा पीठ , ३ उत्तरेस - बदरीनारायण जवळ - ज्योतिर्मठ व ४ दक्षिणेस - शृंगेरी - म्हैसूरप्रदेश - मुख्य़ पीठ .
चार आत्मे - १ जीवात्मा - शरीरांत राहणारा , २ शिवात्मा - जग भरून राहणारा , ३ परमाअत्मा - दिक्कालातीत आणि ४ निर्मलात्मा
( केवळ शुद्ध चैतन्य स्वरूप ) ( दा . बो . १७ - ४५ )
चार आत्मज्ञानाचीं मुख्य साधनें - १ विवेक , २ वैराग्य , ३ शमादि षट्क व ४ मुमुक्षता .
चार आपत्तींची द्वारें - १ अयोग्यकर्माचा आरंभ , २ स्वजनांशीं वैर , ३ बलंवताशीं स्पर्धा आणि ४ दुष्ट स्त्रीचा विश्वास . ( प्रमाणसाहस्त्री )
चार आनंद - ( अ ) १ शब्दानंद , २ कल्पनानंद ३ अनुभवानंदव ४ श्रद्धानंद ( विचारपोथी ).
चार आरोग्याचे शत्रु - १ रसनेची विकृत रुचि , २ देहांतील मृत तंतु , ३ अनवश्य्क अन्न आणि ४ न पचतां जठरांत सांचणारें अन्न .
चार उपाय - १ साम , २ दाम , ३ भेद आणि ४ दंड . ( या . स्मृति )
चार उपाय ( ज्ञान प्राप्तीचे )- १ श्रद्धा , २ तत्परता , ३ इंद्रिय - संयम आणि ४ योगसंसिद्धि ( समत्व बुद्धियोग ) ( भ . गी . ४ - ३९ )
चार उपवेद - १ आयुर्वेद ( ऋग्वेद ) २ धनुर्वेद ( यजुर्वेद , ) ३ गांधर्ववेद ( सामवेद ) आणि ४ स्थापत्यवेद - अर्थशास्त्र ( अथर्ववेद )
( भ . ब्रा . २ - ८ )
चार ऋणें - १ देवऋण , २ ऋषिऋण , ३ पितृऋण व ४ मनुष्यऋण किंवा समाजऋण वा परमात्मऋण ( मानवधर्मसार )
चार ऋत्विज - १ अध्वर्यु , २ ब्रह्या , ३ होता आणि ४ उद्गाता . असे यज्ञांत मुख्य चार ऋत्विज असतात .
चार कर्में ( इस्लाम धर्म )- १ नमाज , २ रोजा , ३ जकात , व ४ हज . ( कल्याण साधनांक )
चार कर्में ( यतींचीं )- १ ध्यान , २ अंतर्बाह्म शुचिता , ३ भिक्षा आणि ४ नित्य एकान्तसेवन .
ध्यांनं शौचं तथा भिषा नित्यमेकान्तशीलता ।
यतेश्चत्वारि कर्माणि पञ्चमं नोपपद्यते ॥ ( स्कंद , काशी . ४१ - २० )
चार कलि ( कलह ) वास्तव्य स्थानें - १ द्यूत , २ मद्यपान , ३ स्त्रियांसंबंधीं क्षुद्र व्यवहार व ४ हिंसा , कलीनें आपल्यास राहावयास स्थान नेमून देण्याविषयीं विनंती केल्यावरून राजा परीक्षितानें हीं चार प्रकारचीं दुष्कृत्यें जेथें चालतात अशीं चार स्थानें नेमून दिलीं .
अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलये ददौ ।
द्यूतं पानं स्त्रियः सूना यत्राधर्मश्चतुर्विधः ( भाग . स्कंध १ - १७ - ३८ )
चार कषाय ( मनोविकार )- १ क्रोध . २ लोभ , ३ मान , व ४ माया . या चारीपासून कर्मबंध उत्पन्न होतो असें जैन धर्म मानतो .
( रत्नकरंडक श्रावकाचार अ १ )
चातुर्वर्ण्य - १ ब्राह्मण , २ क्षत्रिय , ३ वैश्य आणि ४ शूद्र या चार समाजविशेषांना मिळालेलें सामुदायिक नाम .
चार ’ ग ’ कार - १ गंगा , २ गीता , ३ गायत्री आणि ४ गोविंद . या चार ’ ग ’ कारांचें स्मरण करणारांस पुनर्जन्मापासन मुक्त होतां येतें .
गीता गङ्गा च गायत्री गोविन्दो ह्रदि संस्थितः ।
चतुर्गकारसंयोगत पुनर्जन्म न विद्यते ॥ ( पां . गी . )
चार गति - १ देवगति , २ मनुष्यगति , ३ तिर्यंच्गति आणि ४ नरकगति , ( तत्त्वार्थसूत्र )
चार गुण कोंबडयापासून घ्यावेत - १ पहाटे उठणें , २ युद्ध करणें , ३ स्वकष्टार्जित भाग बंधुवर्गास देणें व ४ स्त्रीचें आपत्तीपासून रक्षण करणें ,
युद्धं च प्रातरुत्थानं भोजनं सहबंधुभिः ।
स्त्रियमापद्नतां रक्षेच्चतुः शिक्षेच्च कुक्कुटात् ( वृ . चा . ६ - १८ )
चार गुण दुर्लभ - १ दान - संतोषानें , २ ज्ञान - निगर्वी , ३ शौर्याचे अंगीं क्षमा आणि ४ संपत्तींत त्याग .
" वित्तं त्यागसमेतं दुर्लभमेतच्चतुर्भद्रम् " ( बृहत्स्तोत्ररत्नाकर )
चार गुण शाश्वत स्त्रीत्वाचे - १ रजोदर्शन ; २ गर्मधारण , ३ प्रजोत्पादन व ४ प्रज्ञापोषण . ( नासदीय सूक्त भाष्य - उत्तरार्ध )
चार गुण वृद्धसन्मानानें प्राप्त होतात - १ आयुष्य , २ सौंदर्य , ३ सुख आणि ४ बल ( श्री माताजी )
चार गुण स्वभावसिद्ध असतात - १ औदार्य , २ मधुर भाषण , ३ धैर्य व ४ युक्तायुक्त विचार .
दातृत्वं प्रियवक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता ।
अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारः सहजा गुणाः ॥ ( सु . )
चार गोष्टींवर व्यक्तीचें महत्त्व - १ जन्म ( कुल ), २ रूप , ३ शील आनि ४ अंगति , ( गूढार्थचंद्रिका )
चार गोष्टी एकदा गेल्या म्हणजे पुन्हा न मिळणार्या - १ गेलेली अब्रू , २ वोललेला शब्द , ३ दवडलेली संधि आणि ४ गेलेलें आयुष्य .
चार गोष्टी कल्याणकर - १ वाणीचा संयम , २ अल्पनिद्रा , ३ अल्प - आहार आणि ४ एकाग्र चित्तानें परमेश्वर - स्मरण .
चार गोष्टीपासून ग्रंथ सांभाळावेत - १ तेल , २ पाणी , ३ अस्ताव्यस्तपणें ठेवणें आणि ४ मूर्खांचे हातीं देणें .
तैलाद्रक्षेद् जलाद्रक्षेत रक्षेत् शिथिलबंधनात् ।
मूर्खहस्ते न दातव्यमिदें बदति पुस्तकम् ॥ ( सु . )
चार गोष्टी नसतील तेथें वास्तव्य करूं नये - ( अ ) १ मान अथवा प्रतिष्ठा , २ प्रीति , ३ गोत्रज व ४ ज्ञानसंपादन ; ( आ ) १ धनिक , २ वैद्य , ३ श्रोत्रिय ब्राह्मण आणि ४ जलपूर्णा नदी .
तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयम् ।
ऋणदाता च वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥ ( सु . )
चार गोष्टी निरर्थक - १ घृतरहित भोजन ३ नेता नसलेलें राज्य , ३ वक्ता नसलेली सभा व ४ भूगोल न जाणणारा गणितशास्त्रज्ञ ( सिद्धांत शिरोमणि )
चार गोष्टी पडद्याआड ठेवाव्यात - १ भोज , २ भजन , ३ संपत्ति आणि ४ स्त्री .
भोजन भजन खजाना और नारी
ये चारों चीजें कर परदेखि आरी
चार गोष्टी पवित्र - १ झर्याचें पाणी , २ पतिव्रता स्त्री , ३ कल्याण करणारा राजा अथवा थोर पुरुष व ४ संतुष्ट ब्राह्मण .